Thursday, 23 February 2023

भिवंडी गुन्हे शाखा व कल्याण गुन्हे शाखेच्या संयुक्तिक कारवाईत ३५ लाख १० हजार किमती गुटखा जप्त, तिघांना अटक !

भिवंडी गुन्हे शाखा व कल्याण गुन्हे शाखेच्या संयुक्तिक कारवाईत ३५ लाख १० हजार किमती गुटखा जप्त, तिघांना अटक !

भिवंडी, दि,२३, अरुण पाटील (कोपर) :
         भिवंडी तालुक्यातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध मालांचे गोदामे असून या गोदामांनमध्ये अधिकृत व अनधिकृत मालांची साठवणूक होत असते.अशाच प्रकारे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल्हेर गाव येथे भिवंडी गुन्हे शाखा व कल्याण गुन्हे शाखेने संयुक्तिक करवाई केली. तेथून प्रतिबंधित गुटका जप्त करून या प्रकरणात तिघांना अटक करून नारपोली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
          सविस्तर हकीगत अशी की, गुन्हे शाखा, कल्याण  घटक -३ चे पी.एस.आय. एन.बी. कवडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी नुसार, त्यांनी भिवंडी गुन्हे शाखेचे पो. हवालदार किशोर थोरात, पो. ह. शशिकांत यादव, पो. शिपाई सचिन सोनावणे यांच्यासह नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवंडी _ठाणे मार्गावरील काल्हेर गाव येथील मुख्य रस्त्यावरील अंबिका जनरल स्टोरचा मागे,भोकरे यांच्या कार्यालयाच्या मागे असलेल्या गोडाऊनवर संयुक्तिक छापा मारला.
          त्या वेळी त्या ठिकाणावरून व उभ्या असलेल्या टेंपो. क्रं. एम.एच. _०३, सी. व्ही._१६९३ मधून प्रतिबंधित केलेले व मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक व अपायकारक असलेले पान मसाला, तंबाकू,राज निवास गुटका, विमल पान मसाला, शुद्ध प्लस पान मसाला,पान पराग, पान मसाला, सिग्नीचर पान मसाला, रजनी गंध पान मसाला असा एकूण ३५ लाख १० हजार २८८ रू. किंमती मुद्दे मल हस्तगत केला आहे.
       या प्रकरणात आरोपी म्हणून देवराम पकाराम चौधरी, (वय _२६), भरत भानाराम चौधरी (वय _२३) व जगदीश जिवाराम चौधरी (वय_३२) यांना ताब्यात घेतले आहे. परंतु यातील मुख्य सूत्रधार चौधरी याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून त्याला या प्रकरणातून वगळण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे. हा पकडलेला सर्व माल याच अंबिका जनरल स्टोर्स मधून विकला गेला असता व विकला जात आहे. हे गोडाऊन याच अंबिका जनरल स्टोर्सचे गोडाऊन असल्याने अंबिका जनरल स्टोर्सवर पण कारवाई होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
       या अंबिका जनरल स्टोर्स मधून दिवसाला लाखों रुपयांचा प्रतिबंधित गुटका परिसरातील पान टपऱ्या व दुकानांन मधून विकला जात असतो. मात्र कारवाई आज पर्यंत झालेली नाही.या प्रतिबंधित गुटक्याची माहिती गुन्हे शाखा कल्याण, घटक_३ ला मिळाली मात्र संबधित नारपोली पोलीस ठाणे _भिवंडी व गुन्हे शाखा भिवंडी यांना नाही त्यामूळे हा  ग्रामस्थांनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
       या प्रतिबंधित गुटकच्या सेवनाने तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून या कारवाई नंतर पुन्हा या अंबिका जनरल स्टोर्स मध्ये प्रतिबंधित गुटका विक्री केली जाणार असल्याचे  परिसरातील ग्रामस्थांन मधून बोलले जात आहे.जर सुरू झाल्यास संबधित नारपोली पोलीस ठाणे _भिवंडी कोणती कारवाई करील या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
       या प्रकरणाचा अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मदन बल्लाळ यांच्या मार्गद्शनाखाली ए.पी.आय.श्री.के.के.पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...