कासटवाडी ग्रापंचायत सरपंचाने केला विकास कामांचा धडाका !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक होऊन काही महीने झाले असुन,त्यातच जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नातून कासटवाडी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा धडाका,सुरु केला आहे. ग्रामपंचायत मध्ये जयेस्वर येथे गल्लीबोळ रस्ताला पेव्हर ब्लॉक बसवणे. रामनगर येथे गल्लीबोळ रस्ताला पेव्हर ब्लॉक बसवणे. धूमपाडा येथे गल्लीबोळ रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे. चोंढिचापाडा येथे गल्लीबोळ रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे. .चोंढिचापाडा येथे रस्ताला लगत संरक्षण भिंत बांधणे. धूमपाडा ते पाटीलपाडा रस्ता डांबरीकरण करणे. वडपाडा ते आकरे कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.
या विकास कामांचे उद्घाटन मा. पंचायत समिती सदस्य विनायक राऊत, उपसरपंच सुलोचना चौधरी, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य- त्रिंबक रावते, बाळू भोये, नितीन टोकरे, नितीन चौधरी, कुणाल सापटा व पप्पू होळकर, शंकर इल्हात, भालचंद्र शिंदे, अशोक महाले, संतोष मोकाशी, यशवंत इल्हात, सुरेश माळगावी, राहुल शेंडे, भाऊ गडगे, रोजगार सेवक किसन तुंबडा, आदी उपस्थित राहून होते.
कोट-
नागरिकांना रोजगार कसा निर्माण होईल व प्रत्येक ग्रामस्थांच्या घरा जवळ जाण्यासाठी रस्ता मिळणार तसेच संपूर्ण गावामधे गलीबोळ होणार असून ग्रामस्थांना होणार त्रास कमी होणार आहे.
कल्पेश राऊत - (कासटवाडी ग्रा. सरपंच)
No comments:
Post a Comment