Thursday, 23 February 2023

सिल्लोड येथे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशांचे वितरण !

सिल्लोड येथे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशांचे वितरण !

औरंगाबाद, अखलाख देशमुख : रोहयो योजना अंतर्गत तालुक्यातील 675 लाभार्थ्यांना विहीर तर 104 शेतकऱ्यांना गायगोठा योजनेच्या कार्यारंभ आदेशाचे वितरण कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. आज गुरुवार ( दि.23 ) रोजी शहरातील नगर परिषदेच्या रामरहिम व्यापार संकुल येथे हा सोहळा पार पडला.

      यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पाशा पटेल यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी आहिरे, मुरलीधर काळे, दामूअण्णा गव्हाणे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, , सत्तार बागवान, विश्वास दाभाडे, सतीश ताठे, सुखदेवराव जाधव, भिकाभाऊ वाघ, नगरसेवक अकिल वसईकर , शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, बबलू पठाण, राजुमिया देशमुख, शेख सलीम आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...