Thursday, 23 February 2023

कटकटगेट औरंगाबाद येथील जागेला १ इंच सुध्दा हात लाऊ देणार नाही - शेख युसुफ लिडर

कटकटगेट औरंगाबाद येथील जागेला १ इंच सुध्दा हात लाऊ देणार नाही - शेख युसुफ लिडर 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २३ :  औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली मा.विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले मौजे हत्तेसिंगपुरा, कटकट गेट, औरंगाबाद महाराष्ट्र येथील मिळकत सर्व्हे नं. ३०, पुर्ण क्षेत्र २२ एकर २१ गुंठे व त्याचे दोन भाग सव्हे नं. ३०/१ क्षेत्र ११ एकर ११ गुठे व सर्व्हे नं. ३०/२ क्षेत्र ११ एकर १० गुठे ज्याचा नंतरचा नगर भूमापन क्रमांक ११६०२ / ज्यामध्ये शत्रु संपत्ती बाबत वाद आहे त्याची माहिती.

१- मौजे- हत्तेसिंगपुरा, कटकट गेट, औरंगाबाद येथील सर्व्हे नंबर ३० सर्व्हे नं. १०, एकुण क्षेत्र २२ एकर २१ गुंठे असे होते व त्याचे मुळ मालक मोहम्मद निजीमोद्दीन पिता बशीरोद्दीन व मोहम्मद अहेमदोद्दीन पिता बशीरोद्दीन हे होते व सदर मिळकतीवर पुर्वी पासुन संरक्षांत कुळ म्हणुन अब्दुल सत्तार अब्दुल वाहब, हे होते अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांचा मृत्यु दिनांक १२/०७/१९८९ रोजी झालेला आहे. अब्दुल सत्तार अब्दुल वाहब है कुळ असल्याबाबत जुना महसुल रेकॉर्ड खासरा पत्रक मध्ये तशी नोंद आहे. सोबत खासरा पत्रक जोडले आहे.

२- वरील मिळकत सर्व्हे नं. ३० एकुण क्षेत्र २२ एकर २१ गुंठे या मिळकतीवर अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांना शासना मार्फत तहसिलदार, तहसिल कार्यालय, औरंगाबाद यांनी दिनांक ०७/११/१९५१ रोजी हैद्राबाद कुळ वहिवाट व शेत जमीन कायदा - १९५० चे कलम ३५ आणि ३७ अन्वये संरक्षीत कुळाचे प्रमाणपत्र दिले व त्याआधारे वरील मिळकतीचे कायदेशीर मालकी हक्क व ताबा सन १९५१ पासुन अब्दुल सत्तार अब्दुल वाहब, यांच्याकडे आला व त्यानुसार सर्व्हे नंबरचे ७/१२ वर अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांच्या नावाची नोंद घेण्यात आली. म्हणजेच सन- १९५१ पासुन वरील मिळकतीचे संरक्षीत कुळ आधारे अब्दुल सत्तार अब्दुल वाहब, हे एकमेव मालक व कब्जेदार झाले होते. सोबत संरक्षीत कुळाचे प्रमाणपत्र व ७/१२ जोडला आहे.
     
त्यानंतर सदरील मिळकतीबाबत अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांनी दिनांक ०७ सप्टेंबर १९७१ रोजी सर्व्हे नंबर ३०/१ क्षेत्रफळ ११ एकर ११ गुंठे नोंदणीकृत खरेदीखत मुळ मालकाकडुन करून घेतले व उर्वरित क्षेत्रफळ जे सर्व्हे नं. ३०/२ क्षेत्रफळ ११ एकर १० गुंठे या जमीनीवर कुळाचा हक्क व ताबा कायम होता. परंतु त्यामध्ये मुळ मालक मोहम्मद नाजिमोद्दीन मोहम्मद अहेमदोद्दीन यांनी बेकायदेशीर पणे सर्व्हे नं. ३०/२ क्षेत्रफळ ११ एकर १० गुंठे या मिळकतीचे खरेदीखत अजिमा बेगम मिर खुर्शीद अली, यांना विक्री केले. वास्तविक वरील मिळकत हि अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांच्या संरक्षीत कुळाची मिळकत होती, तरी पण बेकायदेशीर पणे वरील मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले. तसेच वरील मिळकत सर्व्हे नंबर ३०/२ क्षेत्रफळ ११ एकर १० गुंठे हि मिळकत शत्रु संपत्ती म्हणुन घोषीत झाली होती. परंतु त्यामध्ये अजिमा बेगम मिर खुर्शीद अली, यांनी कस्टोडियन ऑफ इनिमी प्रॉपटी मुंबई यांचे कडील पत्रक क्रमांक १०-१०-६२-२१८, दिनांक २९/०२/१९८२ प्रमाणे पुर्वी कडील अर्धा हिस्सा ५ एकर ५ गुंठे हे मालक म्हणुन जाहिर करुन घेतले व त्याआधारे ५ एकर ५ गुंठे मध्ये अजिमा बेगम मयत तर्फे त्यांचे वारस मुले यांची नावे सन १९८३ मध्ये फेर घेण्यात आला व उर्वरित ५ एकर २५ गुंठे जी शिल्लक जमीन होती त्यास सर्व्हे नंबर ३०/३ असा भाग करण्यात आला व ती मिळकत शत्रु संपत्ती म्हणुन फेर त आला. तसेच अबेगम यांचे वारसांनी त्यांची मिळकत ५ एकर ५ गुंठे ही मिळकत वेगवेगळया लोकांना विक्री केली.

४- सर्व्हे नंबर ३०/३ क्षेत्रफळ ५ एकर २५ गुंठे ही मिळकत शत्रु संपत्ती म्हणुन फेर क्रमांक २५१ व ४०८, ५३१ अन्वये नोंद घेण्यात आली व ती नोंद ३९० व ६.५० अन्वये कमी करण्यात आली. कारण त्यामध्ये श्री. लोहारीमल जेठानंद यांचे मुख्त्यार आम शामलाल यश चंदानी यांची नोंद फेर क्रमांक ६५० अन्वये घेण्यात आली. तसेच त्याबाबत लोहारीमल जेठा यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे रिट पिटीशन नं. ५२५६ /१९९५ हे दाखल केले होते व त्यामध्ये भारत सरकार, महाराष्ट्र शासन व कस्टोडीयन ऑफ इनिमि प्रॉपटी यांना पक्षकार केले होते व त्यामध्ये अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांचा वारस मुलगा अब्दुल शकुर अब्दुल सत्तार यांनी पक्षकार झाले होते व त्यामध्ये अंतरीम मनाई हुकूम होता. परंतु ते रिट पिटीशन पक्षकार हजर नसल्यामुळे दिनांक ०८ जुन २०१८ रोजी डी.आय.डी करण्यात आले.
..३..
५. वरील सर्व्हे नंबर ३०/२ ज्याचा पुन्हा एक पार्ट झाला जो की, सर्व्हे नंबर ३० / ३ ज्याचे अनुक्रमे क्षेत्रफळ ३०/२ चे क्षेत्र ५ एकर २५ गुठे व सर्व्हे नं. ३० / ३ चे क्षेत्र ५ एकर २५ गुंठे एकुण क्षेत्रफळ ११ एकर १० गुंठे अशा या दोन्ही मिळकती संरक्षीत कुळ आधारे अब्दुल सत्तार अब्दुल वाहब यांच्या नावे कुळ आधारे मिळाले होते. परंतु वरील मिळकतीचे मालकांनी बेकायदेशीर पणे खरेदीखत नोंदविले व 'मुळ संपत्तीवर नाव लावुन घेतले. त्यामुळे अब्दुल सत्तार अब्दुल वाहब शासनाने शत्रु यांचा वारस मुलगा नामे अब्दुल शकुर पिता अब्दुल सत्तार यांने मा. जिल्हाधिकारी भुसुधार यांच्याकडे कलम ९८ हैद्राबाद कुळ वहिवाट कायदा सन १९५० अन्वये सर्व्हे नंबर ३०/२ क्षेत्रफळ ११ एकर १० गुंठे चा तावा मिळावा म्हणुन प्रकरण क्रं. १९९४/एल.आर/टि.एन.सी/ए/२ हे प्रकरण दाखल केले व त्यामध्ये मुळ मालक 'व त्यांचे वारस कस्टोडीयन इनिमि प्रॉपटी यांना पक्षकार केले व त्यामध्ये दिनांक २२/०९/२००३ रोजी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी अब्दुल शकुर सत्तार यांचा दावा मान्य केला व ताबा देण्याबाबत आदेशीत केले. त्या आदेशाविरुद्ध गैरअर्जदार यांनी एम. आर टीमध्ये अपील दाखल केले होते. परंतु त्यांची अपील खारीज केले. त्यामुळे मा.जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांचा आदेश कायम राहिला व त्याची अंमलबजावणी कामी सध्या तहसिलदार, औरंगाबाद यांच्याकडे प्रकरण क्रमांक ८८/२०१८ हे प्रलंबीत आहे.

६- सदर मिळकत मध्ये मुळ मालक मोहम्मद नाजिमोद्दीन व मोहम्मद अहेमदोद्दीन यांच्या वरील मिळकतीवर सन १९५१ मध्ये अब्दुल सत्तार अब्दुल वाहब हे संरक्षीत कुळ म्हणुन घोषीत झाले होते व तसे प्रमाणपत्र त्यांना मिळाले होते. म्हणजे १९५१ पासुन वरील मिळकतीशी मुळ मालकाचा काही एक हक्क व संबंध राहिला नव्हता, वरील दोन्ही मुळ मालकांपैकी एक मुळ मालक हा पाकीस्तान, कराची येथे राहण्यास गेला होता. परंतु त्यांची मिळकतच कुळ आधारे अब्दुल सत्तार यांना मिळाली होती, तर १९७० मध्ये शत्रु संपत्ती घोषीत करता येणार नाही. परंतु वरील सर्व कायदेशीर पारीस्थित न बघता जिल्हाधिकारी, औरंगाबाद तथा कस्टोडीयन यांनी कुठलीही चौकशी व न्यायालयीन प्रकरणे न पाहता वरील मिळकतीबाबत योग्य ती माहिती वरिष्ठ कार्यालयास न देता चुकीची कार्यवाही वरील मिळकतीबाबत सुरु केली आहे. तसेच तसेच शत्रु संपत्ती बाबतचे ऑर्डर २०२० मधील कलम ६-ग्ग् चे पालन करायला पाहिजे. तसेच न्यायालयीन प्रकरणाची माहिती त्याचे अवलोकन कल्याचे दिसत नाही. नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होउâ शकतो.त्यामुळे वरील कार्यवाही बद्दल पुर्नविचार होणे गरजेचे आहे असे निवेदन देण्यात आले.

  यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, अहेमद चाऊस, अनिस पटेल, सागर नागरे, अरुण क्षिरसाठ, आकेफ रजवी, अनिल माळोदे, उमाकांत खोतकर, महेंद्र रमंडवाल, मोईन इनामदार, मुजफर खान, कैसर बाबा, प्रा.प्रकाश वाघमारे,मुददसिर अन्सारी, श्रीकृष्ण काकडे, शुभम बनकर, किशोर नामेकर, साजीद कुरैशी, अ‍ॅड. दिलीप झोडगे, उमर सौदागर व कटकटगेट येथील रहिवासी अब्दुल मुज्जमिल शेख, सय्यद फैयाजोददीन, फैसल शेख, सय्यद मुश्ताक, जावेदभाई, नवीदभाई, सईदभाई, सय्यद युनुस आदी पदाधिकारी व कटकटगेट येथील रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...