Monday, 13 February 2023

पत्रकार शंशिकात वारीशे यांच्या हत्येचा कल्याण तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध, आरोपीवर कारवाईची मागणी, तहसीलदारांना निवेदन !

पत्रकार शंशिकात वारीशे यांच्या हत्येचा कल्याण तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध, आरोपीवर कारवाईची मागणी, तहसीलदारांना निवेदन !

कल्याण, (संजय कांबळे) : कोकणातील निर्भीड पत्रकार शशिंकात वारीशे यांचा वकरणी अपघात वाटत असलातरी ही पुर्वनियोजीत हत्या च आहे, त्यामुळे या हत्येचा निषेध कल्याण तालुक्यातील पत्रकारांनी केला, यावेळी तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली.

पत्रकार शशिकांत वारीशे यांनी दैनिक महानगरी टाईम्स मधून जमीनीच्या व्यवहारात दलाली करणाऱ्या पंढरीनाथ आंबेरकर याचा गुन्हेगारी पाश्वभूमिचा लेखाजोखा मांडला होता, नेमका याचाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी पत्रकार वारीशे यांचा अपघात घडवून आणला. विचारांचा सामना विचाराने न करता त्यांचा मुडदा पाडायचा ही जणू गुन्हेगारांची टाईल् झाली आहे. यातून शंशिकात वारीशे यांची हत्या झाली, पत्रकाराची हत्या ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील पत्रकारांनी याचा निषेध नोंदवून तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन दिले.
सध्याची परिस्थिती पाहता राज्यात क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पोलिसांचे गुन्हेगारावर नियंत्रण राहिले नाही. सत्तेतील लोकप्रतिनिधी, त्यांचे चेले चपाटे, पत्रकार, वकील, डॉक्टर, सरकार अधिकारी, कर्मचारी यांच्या वर बिनधास्त हल्ले करत आहेत. गुन्हेगारी चे उदात्तीकरण होऊ लागले आहे. यातून आपसूकच त्यांना राजाश्रय मिळत आहे. हे थोडेफार शिल्लक राहिलेल्या लोकशाहिला मारक आहे, विरोध करणाऱ्या ला संपवने हा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यामुळे हे सर्व राजकारण बाजूला ठेवून नि:पक्ष या प्रकरणाची चौकशी करून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्यासह यामागील मुख्य सुत्रधार कोण? याची चौकशी करावी. तसेच शक्य असल्यास हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी ,तेव्हाच लोकशाही घा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेला न्याय मिळाला असे आम्ही मानू शकतो असे या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, कल्याण नागरिक चे संपादक, मच्छिंद्र कांबळे, बातमीदार माझा चे संपादक सचिन बुटाला, जनमत चे विलास भोईर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भोईर, पत्रकार सिद्धार्थ गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना शासनापर्यत पोहचवल्या जातील असे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...