Monday, 13 February 2023

टीम सचिन चाहते परिवार तर्फे आयोजित भव्य-दिव्य क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

टीम सचिन चाहते परिवार तर्फे आयोजित भव्य-दिव्य क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई / दिपक कारकर :

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या टिम सचिन चाहते परिवाराच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा नुकत्याच रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी एकदिवसीय आयोजनात विरार मधील अग्रवाल मैदानात पार पडल्या.ह्या स्पर्धेत ( वाडी मर्यादित गट ) असणाऱ्या स्वरूपात १) श्री गणेश क्रिकेट संघ बामणे वाडी पाभरे, २) मैत्री ११ क्रिकेट संघ ( मुंबई ), ३) शिव ११ गावठण वाडी पाभरे ४) जय गणेश क्रिकेट संघ, ५) विठु माऊली क्रिकेट संघ पाभरे,६) वाडदई खालची वाडी, ७) श्रेयांस ११ वरवेळी,८) दत्तकृपा क्रिकेट संघ आग्रेवाडी ( संगमेश्वर ), ९) पार्थीव ११ स्टार ( भातगाव वडाचीवाडी ), १०) श्री.वाघजाई क्रिकेट संघ ( कातळवाडी ), ११) पन्हाळजे फणसवाडी ( खेड ), १२) सिद्धिविनायक क्रिकेट संघ तळवली ( डावलवाडी ), १३) श्रीराम स्पोर्टस् पालगड ( कातळवाडी ),१४) जय गणेश क्रिकेट संघ,अनारी, १५) श्री चंडिका वरदान क्रिकेट संघ ( कर्दे ), १६) बाबार वाडी क्रिकेट संघ आदी १६ संघानी सहभाग घेतला होता. 

स्पर्धेला श्री.संतोषजी जैतापकर साहेब आणि त्याचे सहकारी श्री.मनोज ढापले साहेब, संपुर्ण सामन्यांचे चित्रिकरण करण्यासाठी धृव म्युझिकचे सन्मा. गाला साहेब, संजयजी आगीवले, कवी रमाकांत जावळे, कलाकार योगेश ओकटे, कृष्णा येद्रे, संदेश घाडे, संतोष घाणेकर, सुदर्शन जाधव, संजय पाष्टे, संतोष कुर्टे असे कोकण भूमीतील हिरे खास करुन उपस्थित होते.ह्या स्पर्धेत प्रथम विजेता संघ - संघ मालक रमेश भेकरे यांचा जय गणेश क्रिकेट संघ ( पालपेणे ),द्वितीय विजेता संघ - पार्थिव ११ स्टार भातगाव वडाची वाडी,उत्कृष्ट फलंदाज - अंकेश  (भातगाव), उत्कृष्ट गोलंदाज - कल्पेश (पालपेणे ), मालिकावीर - कल्पेश (पालपेणे ), शिस्तबद्ध संघ - मैत्री ११ संघ, शिस्तबद्ध कर्णधार - पार्थिव ११ स्टार भातगाव अशा स्पर्धेतील सर्व विजयी संघ/खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

ह्या स्पर्धेतील २ र्या पर्वाला खेळाडू, मान्यवर यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, भविष्यात क्रिकेट स्पर्धेतून आम्ही टीम सचिन चाहते परिवार होतकरू खेळाडू घडविण्याच्या संकल्पनेने असे उपक्रम घेत राहू, शिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू असे उद्गार काढत परिवाराचे सर्वेसर्वा शाहीर सचिन धुमक यांनी बोलताना सांगितले, सर्व हितचिंतक/ देणगीदार यांचे आभार मानत स्पर्धेची सांगता झाली.ह्या स्तुत्य आयोजनाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...