एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड, शिवसेनेच्या पक्ष प्रमुखपदी नाही !
भिवंडी, दि,२२, अरुण पाटील (कोपर) :
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर शिवसेना पक्षाची कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य नेते पदी निवड झाली असुन बऱ्याच कार्यकर्त्यांनामध्ये चर्चा होते की शिवसेना पक्ष प्रमुख पदी निवड होइल मात्र तसे झाले नाही.या निवडीमुळे शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार असुन शिंदे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी कायम आहेत.
याबाबत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, यावेळी अनेक ठराव संमत झाले. तसेच निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच सर्व निर्णय झाल्याचं ते म्हणाले. घटनेला अनुसरूनच एकनाथ शिंदे यांनी कार्यकारणीला संबोधित केलं आहे. तसेच कोणाच्याही संपत्तीवर आणि अकाऊंटवर मालमत्तेवर आमचा अधिकार दाखवणार नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढं चालल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केल्याचं सामंत यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव झाले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वाधिकार शिंदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव झाला. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच वि.दा. सावरकर यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याचा ठरावही घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment