सामान्य नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिके समोर करणार आमरण उपोषण.... *रूचिता अमित नाईक (शिवसेना महिला आघाडी शहर संघटक)*
वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (प) मधिल समेळगाव येथे एकमेव स्मशानभूमी आहे माझ्या मागणी नुसार महापालिकेने विद्युत शवदाहीनी बसवली पण वर्ष झाले अद्याप पर्यंत महापालिकेला सूरू करण्यास मुहूर्त मिळत नाही.
समेळगाव येथिल अनधिकृत मोबाईल टॉवर चा रेडिएशन मुळे शाळेतील मुलांचे व नागरीकांचे आरोग्य धोक्यात असुन तसेच नालासोपारा (प) मधिल वाढते अनधिकृत बांधकाम करून सामान्य नागरीकांची आर्थिक फसवणुक केल्यामुळे अनेक कुटूंबे उध्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत कारवाई करण्याबाबत तीन महिन्यांपासून पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत आहे. प्रभाग समिती ई चे अधिकारी हे जाणिवपूर्वक खोटे बोलुन व अनधिकृत मोबाईल टॉवर व अनधिकृत बांधकामांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे.
अनेक वेळा कारवाई करण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने अशा खोट्या भूलथापांना कंटाळून मी बुधवार दिनांक 01/03/2023 रोजी 11.30 वाजल्यापासून आमरण उपोषणास बसणार आहे.
जोपर्यंत विद्युत शवदाहीनी सुरू करत नाही तसेच अनधिकृत मोबाईल टॉवर बांधणारे व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सुरू राहिल माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांचा जीवाचे काही बरेवाईट झाल्यास यास सर्वस्वी प्रभाग समिती ई चे अधिकारी जबाबदार असतील. असे निवेदन वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सहाय्यक आयुक्त व नालासोपारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिले....
No comments:
Post a Comment