Thursday, 9 February 2023

वेंकटेश रापेल्ली यांना सोनाक्षी कला सेवा संस्थे तर्फे उत्कृष्ट "चित्रकार" पुरस्काराने सन्मानित !

वेंकटेश रापेल्ली यांना सोनाक्षी कला सेवा संस्थे तर्फे 
उत्कृष्ट "चित्रकार" पुरस्काराने सन्मानित !

भिवंडी, दि,९,अरुण पाटील (कोपर)
         "उत्कृष्ट चित्रकार पुरस्कार" भिवंडी येथील पत्रकार तथा  प्रसिद्ध चित्रकार श्री वेंकटेश रापेल्ली यांना ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचीते यांच्या शुभ हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.या पुरस्काराने भिवंडीतील शुभ चींतकांनी रापेल्ली यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
            दि:५/२/२०२३ रोजी गोवर्धन कौशल्य केंद्र गालथरे ता. वाडा येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कला क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
          या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून "तिरंगा" या चित्रपटात प्रल्ह्यानाथ गेंडा स्वामी हे पात्र अजरामर करणारे जेष्ठ अभिनेते दिपक शिर्के, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे शहापूरचे कुलगुरू डॉ. कैलास महाराज निचीते, गणराज बहुउद्देशीय संस्था भिवंडीचे अध्यक्ष संदीप गणपती कांबळे, जिल्हा परिषद शाळा अनगावचे मुख्याध्यापक कवी माधव गुरव सर, शिक्षक पतसंस्था वाणाचे संचालक राजू महाले व इतर मान्यवर उपस्थित होते.
        सोनाक्षी कला सेवा संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, श्रद्धा पडवळ आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...