ग्रामीण शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वात्सल्य ट्रस्ट कडून गणवेश वाटप !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
छत्रपती शिक्षण संस्थेच्या जयजवान जय किसान वाघरी, वारंगी. रायगड येथील माध्यमिक शाळेतील अत्यंत गरजू २५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यासाठी कोकण कट्टा विलेपार्लेचे संस्थापक अजित पितळे व जय मल्हार धनगर सामाजिक संस्थेचे बाळाराम कुपेकर यांच्या विशेष मार्गदर्शनाने मुंबईतील नामवंत सेवाभावी संस्था वात्सल्य ट्रस्ट च्या आर्थिक सहकार्याने हे गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक श्री.देवरुखकर सर, श्री. गरधे सर, श्री. काळगूडे सर व जय मल्हार धनगर सामाजिक संस्थेचे श्री.सुनिल ढेबे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. प्राध्यापक व उपस्थित शिक्षक वर्गानी वात्सल्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे मनस्वी आभार मानले.कोकण कट्टा व बाळाराम कुपेकर यांच्या योग्य मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम होऊ शकला असे उदगार काढून धन्यवाद दिले. या गरजू शालेय विध्यार्थ्यासाठी वेळोवेळी आपले सहकार्य लाभावे यासाठी विनंती ही केली.
No comments:
Post a Comment