Saturday, 11 February 2023

वेरुळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव "पुर्वरंग" या कार्यक्रमाने सुरवात !

वेरुळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव "पुर्वरंग" या कार्यक्रमाने सुरवात ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १२ : वेरूळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सव या वर्षी दि. २५, २६, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची सुरुवात ‘पूर्वरंग’ या विशेष कार्यक्रमाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ पासून होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे पूर्वरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सोनीया परचुरे व संच सुप्रसिध्द बॅले नृत्य सादर करणार आहेत. तसेच सांज अमृताची हा मराठी व हिंदी गाणी, सुफीगाणी यांचा कार्यक्रम गायक शाल्मली सुखटनकर, आशिष देशमुख, मंदार आपटे व माधुरी करमरकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत. 

हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मोफत असून, प्रवेशासाठी पासेस लागणार नाहीत. आसनक्षमता मर्यादित असून 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' बेसीस वरती प्रवेश दिला जाईल. काही आसने आमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरवासीयांनी तसेच सर्व पर्यटकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...