"मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)"
राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित केल्या जातील.
धान शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. १ हजार कोटी निधीस मान्यता दिली असून त्याचा ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल.
महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्यात आली. औषधी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होईल.
पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती दिली जाईल. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख, जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी १२७ कोटी २७ लाख तसेच सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्यात येईल. यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.
वृत्तांकन - अखलाख देशमुख, मुंबई
No comments:
Post a Comment