असाही एक अनोखा व्हॅलेंटाईन डे साजरा ; अलर्ट सिटिझन फोरम ( रजि.) मुंबई संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम! !
मुंबई / ( दिपक कारकर )
१४ फेब्रुवारी म्हटले की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं,ते हया दिवसाला घेऊन असलेले आकर्षण आणि ह्याच विचारांचे परिवर्तन करत या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत माणुसकी रूजवण्याचा संस्थेचा एक प्रामाणिक प्रयत्न कौतकास्पद ठरत आहे.
उपरोक्त संस्था मागील ६ वर्षांपासून विभागातील वृद्ध नागरिक,वाॅचमेन दादा,सफाई कामगार दादा, पोस्टमन,ट्राफिक पोलिस, डॉक्टर यांसारख्या सामाजिक कर्तव्य पार पाडत योगदान देणाऱ्या व्यक्तिं बरोबर साजरा करत सामाजिक जाणीव निर्माण करत “आपुलकीचा दिवस" हा उपक्रम यशस्वी राबवत आहे.
नुकताच यंदाच्या ७ व्या वर्षी देखील बेस्ट बस कर्मचारी आणि पेट्रोलपंप कर्मचारी यांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती तसेच या दिवसाचे विशेष महत्व सांगत कर्मचारी वर्ग यांना "प्रेमाचं प्रतीक भेट" म्हणून देण्यात आले. यावेळी बेस्टचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
ह्या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांमुळे खूप जणांचे चेहरे सुखावले व आनंद देखील अनुभवायला मिळाला आहे.या व्यतिरक्त मुंबईत,ठाणे,पालघर जिल्ह्यात विविध संस्था व संस्थेचे सदस्य यांनी देखील हा उपक्रम राबवत सामाजिक संदेश दिला. सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सहकारी, देणगीदार, हितचिंतक यांनी विशेष मेहनत घेतली.ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment