Thursday, 6 April 2023

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनाच्या मुंबई, नवीमुंबई, सोलापूरसह पदाधिकारी जाहिर !

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनाच्या मुंबई, नवीमुंबई, सोलापूरसह पदाधिकारी जाहिर !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सन्मा. श्री. दिवाकर  रावते, उपनेते श्री. रविंद्र मिर्लेकर, उपनेते श्री. नितीन बानगुडे पाटील, शिवसेना सचिव श्री. पराग डाके, यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्षा सौ. शुभा राऊळ मॅडम यांच्या सूचनेनुसार कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, महाराष्ट्र समन्वयक श्री. जितेन्द्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शिवसेना भवन दादर येथे जाहीर करण्यात आल्या.
             मुंबई कांदिवली पूर्व विधानसभा अध्यक्ष (डॉक्टर सेल) पदी डॉ. संतोष पद्माकर भानुशाली, कांदिवली पूर्व विधानसभा सचिव (डॉक्टर सेल) पदी डॉ. धनंजय मधुकर दढेकर, नवी मुंबई विभाग बेलापूर विधानसभा बेलापूर विधानसभा समन्वयक पदी श्री. श्रीकांत धोंडीराम साळवी, बेलापूर विभाग समन्वय सचिव पदी श्री. अनिरुद्ध अवधुत नरुटे, नेरूळ विभाग समन्वय सचिव पदी श्री. युगांतर पंजाबराव लोखंडे, सानपाडा विभाग समन्वय सचिव पदी श्री. राजेश विजय काळे, वाशी विभाग समन्वय सचिव पदी श्री. केशव रविंद्र शिंदे, सिवुड विभाग समन्वय सचिव पदी श्री. संकेत जयवंत मोरे तर ऐरोली विधान सभा ऐरोली विभाग समन्वय सचिव पदी श्री. संतोष अशोक पांचाळ, घणसोली विभाग समन्वय सचिव पदी श्री. मनोज अशोक राऊत, कोपर खैरणे विभाग समन्वय सचिव पदी श्री. रोहित तानाजी शिरसट, घणसोली विभाग समन्वय सचिव पदी सौ. मंजुळा संदेश म्हात्रे, घणसोली विभाग समन्वय सचिव पदी सौ. नमिता वैभव सुरवसे आणि सोलापुर जिल्हा व तालुका साठी महिला जिल्हाध्यक्ष (डॉक्टर सेल) पदी डाॅ. राजश्री आनिल क्षिरसागर, सांगोला तालुका समन्वयक पदी श्री. नवल भिमराव गाडे, पंढरपुर तालुका समन्वयक पदी श्री. गोसपाक अहमद आतार, पंढरपुर तालुका सह समन्वयक पदी श्री. महेश मधुकर काबळे, दक्षिण सोलापुर तालुका समन्वयक श्री. पदीमयुर सिद्राम मुद्रुपकर, दक्षिण सोलापूर तालुका सह समन्वयक पदी श्री. सोमनाथ चंद्रकात मोरडे, आकोलकोट तालुका समन्वयक पदी श्री. साबीर आहमद सौयोदिन मुजावर, माढा तालुका समन्वयक पदी श्री. सावता नवनाथ इंगळे, माढा तालुका सह समन्वयक पदी श्री. ओम गणेश स्वामी, बार्शी तालुका समन्वयक पदी श्री. सतीश रंगनाथ जगताप, बार्शी तालुका सहसमन्वयक पदी श्री. पांडुरंग घोलप, आकोलकट तालुका सह समन्वयक पदी श्री. चादबाशा सलीम मुजावर या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
                  याप्रसंगी मुंबई जिल्हा संपर्क समन्वय श्री. अमोल वंजारे,जालना जिल्हा संपर्क समन्वयक श्री. मकरंद राजहंस, मुंबई उ.नगर (पू.) सहसमन्वयक श्री. प्रकाश वाणी, घाटकोपर (प.) विधानसभा समन्वयक श्री. विनायक कानसकर, नवी मुंबई विभागीय समन्वयक श्री. प्रवीण वागराळकर, भांडुप विधा.समन्वय सचिव श्री. प्रवीण ढवळे, मानखुर्द विधा, सचिव श्री. अभिजित देसाई, नेवासा तालुका सचिव श्री. करण सरोदे उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अनेकांनी यनिमित्ताने अभिनंदनसह शुभेछा दिल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...