महाविद्यालयाचा लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा नामकरण समारंभाचे आयोजन !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
रयत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा या महाविद्यालयाला मा. रामशेठ ठाकूर (सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा, अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती) यांनी भरीव देणगी देऊन विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. मोखाडा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी महाविद्यालयासाठी भरीव देणगी दिली आहे. एवढेच नव्हे तर रामशेठ ठाकूर साहेब यांनी प्रत्यक्ष आदिवासींच्या झोपडी पर्यंत जाऊन आदिवासींची समस्या समजून घेतल्या आहेत. 'आदिवासींची सेवा हीच परमेश्वर सेवा' मानणाऱ्या रामशेठ ठाकूर यांनी आदिवासी लोकांचे कष्टमय जीवन जाणून घेऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ध्यास घेतला आहे. आधुनिक युगात त्यांच्यासारखा माणूस या समाजाच्या मागे उभा आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करीत आहेत. त्यांनी दिलेल्या देणगीतून आज नवीन इमारतीचे उद्घाटन व महाविद्यालयाचा लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा नामकरण समारंभ शनिवार दिनांक ०८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ : ३० वाजता संपन्न होत आहे. या नूतन इमारतीचे उद्घाटन मा. खासदार पद्मविभूषण शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी मा. दिलीप रावजी वळसे पाटील (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मा. डॉ. अनिल पाटील (चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा) राहणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. ना. रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरी पुरवठा मंत्री पालकमंत्री जिल्हा पालघर), मा. रामशेठ ठाकूर (सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा, अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती), मा. आमदार सुनील भुसार( सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, सदस्य महाविद्यालय विकास समिती), मा. मधुकर भावे (जेष्ठ पत्रकार व विचारवंत), मा. प्रशांत ठाकूर (आमदार पनवेल विधानसभा मतदारसंघ), मा. बाळाराम पाटील (विभागीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्था रायगड विभाग), सदस्य महाविद्यालय विकास समिती), मा. प्रकाश निकम (अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, सदस्य महाविद्यालय विकास समिती), मा. अमोल पाटील (नगराध्यक्ष नगरपंचायत मोखाडा), मा. भास्कर थेतले (सभापती पंचायत समिती मोखाडा) तसेच रयत शिक्षण संस्थेचे इतर मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व जनरल बॉडी सदस्य आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. भगीरथ शिंदे (व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था सातारा), प्रि. डॉ. विठ्ठल शिवणकर (सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा), डॉ. एल. डी. भोर (प्राचार्य लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय) यांनी केले आहे. आयोजकांनी सदर कार्यक्रमासाठी मोखाडा पंचक्रोशीतील सर्व मान्यवर तसेच पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment