Thursday, 6 April 2023

कांबा समतानगर रहिवाशांनी केला आई गावदेवी मंदिर कमिटी चा सत्कार, ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक !

कांबा समतानगर रहिवाशांनी केला आई गावदेवी मंदिर कमिटी चा सत्कार, ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कांबा गावातील ग्रामस्थांनी स्वतः कष्ट घेऊन तसेच अनेक दानशुर मंडळींच्या सहकार्याने गावाच्या मध्यभागी सर्वागसुंदर असे गावदेवी मातेचे मंदिर उभारले आहे, त्यामुळे त्यांच्या या कामाचे कौतुक व्हावे म्हणून याच गावातील समतानगर रहिवासी मंडळाकडून आज मंदिरातच मंदिर कमिटीच्या सदस्यांना फेटे बांधून व गोड लाडू भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत अगदी गावाच्या मध्यभागी अतिशय सुंदर, देखणे, व आकर्षक असे गावदेवी मंदिर बांधण्यात आले आहे. नुकताच मंदिरात देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

आज हनुमान जयंती निमित्त सर्वत्र मोठ्या प्रमाणात भजन किर्तन, भंडारा, असे विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आई गावदेवी मंदिर, कांबा कमिटी यांचा सत्कार समता नगर रहिवासी संघातर्फे अरूणा फुलपगार, जयप्रकाश फुलपगार, देवराम उबाळे, कुंडलिक खंडाळे, आनंद भालेराव, प्रशांत धुरी यांनी भगवे फेटे, पुष्पगुच्छ आणि लाडू भरवून मंदिर कमिटीचे सदस्य, संतोष भगत, अनंता ठाकरे, दत्ता आलोराम भोईर, आत्माराम बनकरी, देवराम शिरोसे, अरूण शिरोसे, विलास शिरोसे, रवि शांताराम शिरोसे, दिनकर बाबु पावशे, महेश सुरेश पावशे, बाळाराम धोंडू गायकर , दिपक शिरोसे, अनंता सावळाराम शिरोसे, गंगाराम शिरोसे यांचा पत्रकार संजय कांबळे आदींचा सत्कार केला.

याप्रसंगी कांबा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती सुनंदा शंशिकात पाटील, लिपिक, गुरु बनकरी, समाजसेवक, उत्तम सुरोशे, मधुकर सुरोशे, उषाताई गायकर, राजेंद्र सुरोशे,आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार व कौतुकामुळे मंदिर कमिटी व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...