केतन भोज यांच्या मागणी नंतर आरोग्य विभागाकडून आरोग्य उपकेंद्र स्तरावर रुग्ण सर्वेक्षण तसेच आरोग्य तपासणी सुरू !
रत्नागिरी, शांताराम गुडेकर : राज्यासह देशभरात कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे तसेच जिल्ह्याच्या काही भागात देखील कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत,यासाठी खबरदारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष पथकाची नेमणूक करून आरोग्य तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली होती,भोज यांच्या मागणी नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी त्यांच्या आरोग्य सेवक/सेविका,आशा स्वयंसेविका यांचेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य उपकेंद्र स्तरावर रुग्ण सर्वेक्षण करून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे,तसेच आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या आरोग्य माहिती पत्रकाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती ही करण्यात येत आहे तसेच नागरिकांनी ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment