संतोष खरटमोल यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघ महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती !
*ठाणे - उदय दणदणे*
एस. के. प्रो फिटनेसचे संस्थापक, योगशिक्षक संतोष महादेव खरटमोल हे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, मुंबई जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी व सदस्य हे अध्यक्ष संतोष खरटमोल यांच्या पाठीशी सदैव उभे राहून मुंबई व मुंबई बाहेर सुद्धा योगविषयी अनेक उपक्रम राबवित असतात, महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) चे अनेक उपक्रम राबविण्यात सुद्धा मुंबई टीम सदैव अग्रेसर असते, याचीच पोचपावती म्हणून महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष म. खरटमोल यांना महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्यच्या) उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच मुंबई जिल्ह्याचे सचिव सुषमा सचिन माने यांना महाराष्ट्र योगशिक्षक संघ, महाराष्ट्र राज्यच्या मार्गदर्शन मंडळावर नियुक्त करण्यात आले आहे.
या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संतोष म. खरटमोल व सुषमा स. माने यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!
No comments:
Post a Comment