Thursday, 6 April 2023

कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची यात्रा महोत्सवात प्रमुख उपस्थिती तसेच भैरवनाथ मंदिर ते पळासखेडा रस्त्याचे भुमीपुजन !

कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची यात्रा महोत्सवात प्रमुख उपस्थिती तसेच भैरवनाथ मंदिर ते पळासखेडा रस्त्याचे भुमीपुजन ! 

सोयगाव, अखलाख देशमुख, दि ६ : सोयगाव तालुक्याचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची यात्रा महोत्सवात प्रमुख उपस्थिती होती . मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित भविक भक्तांशी संवाद साधून यात्रा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थांनच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. 

-----------------------------------------------
भैरवनाथ मंदिर , पळासखेडा - वाकोद रस्त्याचे भूमिपूजन

     यावेळी भैरवनाथ - पळासखेडा - वाकोद रस्त्ता कामाचे भूमिपूजन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने या रस्ता कामासाठी 4 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या रस्त्याच्या कामामुळे सोयगाव शहरातील शेंदूरणी रस्ता ते भैरवनाथ मंदिर तसेच पुढे पळासखेडा - वाकोद पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम होणार असल्याने येत्या वर्षी भैरवनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता सज्ज असेल असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. 

     यावेळी उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे,जिल्हा उप निबंधक डॉ. मुकेश बारहाते,सहाय्य्क निबंधक सिल्लोड सोयगाव ज्ञानेश्वर मातेरे, सहकार अधिकारी एस. के. गाझीलवाड नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगरध्यक्षा तथा संचालिका जिल्हा बँक सौ. सुरेखाताई व काळे, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, एपीआय अमोल केदार, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, नगरसेवक अक्षय काळे, कदिर शहा, हर्षल काळे, राजेंद्र घनघाव, राजू दुतोंडे, किशोर मापारी, अक्षय इंगळे, अशोक खेडकर, भगवान जोहरे, संदीप सुरळकर, रउफ शेख,गजानन कुडके, अशोक खेडकर, लतिफ शहा, मोतीराम पंडित, नितीन बोरसे, दिलीप देसाई, रमेश गव्हाडे, मुकुंद तळेले, तुकाराम तायडे, विक्रम चौधरी, संजय आगे, मुरली बापू, मंगेश चौधरी, जयेंद्र चौधरी, राधेश्याम जाधव, अमोल पाटील, राजेंद्र काळे, युवराज काळे, दिलीप रावणे, नाना काळे रमेश चौधरी‌ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...