कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन !
रायगड, अखलाख देशमुख : रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील किल्ला येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय ईमारतीचे उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय भरड धान्य 2023 ता निमित्ताने येथे आयोजित शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्यासह खासदार सुनील तटकरे, आमदार कु. आदिती तटकरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. बाळकृष्ण देसाई , विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, डॉ. मनोज तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment