मौजे पारंबी (मुक्ताईनगर) येथे नवीन भाजपा शाखेचे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...
मुक्ताईनगर, अखलाख देशमुख, दि ८ : मौजे पारंबी (मुक्ताईनगर) येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर व बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शाखेचे *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या, तसेच प्रमुख पदाधिकारी यांचे कडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर व बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण सर, नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, राहुल राणे, रसाल पवार, संतोष झनके, नंदु खेवलकर, राजेंद्र सवळे, अजगर खान, सोपान झाल्टे, दिगंबर विटे, विलास धाडे, प्रवीण शिंपी, सोपान झाल्टे, प्रदीप गोंधळी, निखील भोलाणकर, प्रमोद कोळी, गजानन कोळी,राजेंद्र बावस्कर, रामेश्वर कोळी, हमीद तडवी, श्रीकृष्ण बावस्कर ,रामेश्वर कोळी, प्रमोद कोळी, किसना बावस्कर व स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment