बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप !
'स्फूर्ती फाउंडेशन' व 'ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभाग जिल्हा नियोजन समिती' यांचा संयुक्त उपक्रम...
कल्याण पश्चिम -
स्फूर्ती फाउंडेशन व ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभाग जिल्हा नियोजन समिती ठाणे यांचा संयुक्त विद्यमाने
महिला व बालविकास विभाग जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या ३% निधितून विधवा भगिनींसाठी स्वयंरोजगार योजना शिलाई प्रशिक्षण झाल्यानंतर शिवण यंत्र वाटप कल्याण येथे करण्यात आले.
विधवा गरजू महिलांना स्वयंरोजगार व उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग शांताराम तांगडकर व सदस्या शिल्पा बजरंग तांगडकर यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम राबविला. कल्याण पश्चिम येथे १० दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणात शिलाई मशीन ची माहिती, प्रात्यक्षिक चालवणे, महिलांची उपस्थिती या आधारावर त्याची परिक्षा घेऊन १० दिवसाचे शिलाई मशिन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
यावेळी कल्याण -डोंबिवली महापालिका परिसरातील बारावे, टावरीपाडा, सह्याद्री नगर, गणेशनगर, गौरीपाडा, योगीधाम, मिलिंद नगर, घोलप नगर, भवानी नगर, बिर्ला कॉलेज, बेतूरकरपाडा, चिकनघर, लाल चौकी, बैलबाजार, आधारवाडी, कल्याण पूर्व, परिसरातील विधवा महिलांना शिलाई मशीन सह मशीन मोटार, टेबल असे २३ प्रकारचे विविध साहित्य व ३ लाख रूपयाचा खाजगी कंपनीचा इन्शुरन्स व प्रशिक्षण पत्रक महिलांना देण्यात आले.
यावेळी महिला बालविकास विभाग अधिकारी महेंद्र गायकवाड, विद्याधर गावकर ॲडव्होकेट विद्या मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उत्तेकर, तारा पाटील, श्रद्धा उत्तेकर, रजनी आहिरे, दिपाली आमडोसकर, शारदा मालविया, स्वाती जरीवाला ,सुरेखा रायबान, वैशाली मिरकुटे, छाया मिरकूटे, मनिषा मोरे, रंजना माने, गणेश कंडु, सुरज पवार, अर्जुन बिराजदार, शशिकांत पात्रे, लक्ष्मण शिंपी, यांचे विशेष सहकार्य लाभले.
विधवा महिलांशी चर्चा केल्यानंतर आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून रोजगार,पेंशन साठी कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयात ,बॅंक मध्ये हेलपाटे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे त्या कधी कधी हतबल होताना दिसत आहे याबाबत नक्कीच शासनाकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे ते शेवटी म्हणाले.
ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभाग व अधिकारी यांचे त्यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment