Saturday, 15 April 2023

वंचित बहुजन आघाडी तर्फे शेरे गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती उत्साहात साजरी !

वंचित बहुजन आघाडी तर्फे शेरे गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती उत्साहात साजरी !

कल्याण, (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शहापूर तालुक्यातील शेरे गावात वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शहापूर तालुक्यातील शेरे गावात गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक निघत नव्हती, मात्र यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन यावेळी १३२ वी जंयती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भीमरथ तयार करून सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली, बौद्ध वाड्यातील मुले मुली, स्त्री पुरुष, अबालवृध्द अशा सर्वांना पांढरेशुभ्र कपडे परिधान केल्याने मिरवणुकीला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते. डिजेच्या तालावर सर्वच बेधुंद होऊन नाचत होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी शेरे गाव दणाणून गेले. 

मिरवणूकीत गावातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. मिरवणूक संपूर्ण गावातून फिरल्यानंतर गावाच्या मुख्य प्रवेशद्वार व्दारातून सभास्थळी पोहचली.

येथे बौध्द उपासक किशोर पंडित यांनी  सामुदायिक वंदना घेतल्यानंतर उपस्थित पाहुण्याचे स्वागत करण्यात आला. यावेळी सभेच्या अध्यक्षा, शेरे ग्रामपंचायत सदस्या सविता पंडित यांच्या उपस्थितीतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. डॉ श्रीकांत तारमाळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी किती बिकट परिस्थितीत शिक्षण घेतले हे सांगितले, तर ओबीसी समितीचे वसंत तारमळे यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजासाठी मोठे महान कार्य केले आहे. जातीपातीच्या जोखडातून समाजाची मुक्तता केली. चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, माणगाव परिषद, आदी महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. तर पत्रकार संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणायचे असेल तर आपल्याला शिक्षणा शिवाय पर्याय नाही, ते म्हणाले, आपण कोणत्याही क्षेत्रात टाँप रहा, तेव्हा तुम्ही बाबासाहेबांचे पाईक म्हणून घेऊ शकता, आपल्या समाजाचेभले करायचे असेल तर उच्च शिक्षण गरजेचे आहे असे बोलून आपल्या घटनेने जसे अधिकार दिले आहेत तसे कर्तव्य पण सांगितले आहे, त्याचे पालन करायला हवे.

यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविता पंडित यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी सुनील उबाळे, जगदीश धनगर, नामदेव उबाळे, भगवान उबाळे, गौतम उबाळे, सुनील भालेराव, रमेश जाधव, अभिषेक उबाळे, किशोर पंडित, राम पंडित, भास्कर पंडित, जयवंत तारमळे, संतोष धनगर, राम तारमळे, सुनील तारमळे, कुंडलीक तारमळे, अरुण तारमळे, संदेश धनगर, त्रुतीक धनगर, मनोहर धनगर, अवीनाश धनगर, राजा धनगर, गणेश भोईर, अनंता पंडित, नंदकुमार धनगर व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...