भीम एकता फाऊंडेशन तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खीर दान !
कल्याण दि १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त भीम एकता फाऊंडेशन यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे खीर दान करण्यात आले.
भीम एकता फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रियाताई ओव्हाळ या व त्यांचे सहकारी गेले दहा वर्षे बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कल्याण (पश्चिम) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खीर दान कार्यक्रम करत असतात, आज जी काय मी आहे ती फक्त बाबासाहेबांमुळे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या खीर दान कार्यक्रमला ज्यांनी हातभार लावला त्या सर्व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे आभार मानले आहेत तसेच यावेळी कल्याण पश्चिमचे माजी आमदार माननीय नरेंद्र पवार, माननीय अजय सावंत, माननीय डॉ प्रशांत पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment