Friday, 14 April 2023

अंबाडी नाका येथे आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन !

अंबाडी नाका येथे आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन !

अंबाडी,  दि.१५ (ऑनलाईन वृत्तसेवा): महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पालघर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने वाडा - देसई नाका ते अंबाडी नाका दरम्यान मोटार साईकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली दरम्यान खंडेश्वरीनाका तसेच अंबाडी नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. 
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंबाडी नाका येथे आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. "अंबाडी परिसर, गणेशपुरी, वज्रेश्वरी या भागातील ज्या नागरीकांवर अन्याय होतात अशा नागरीकांनी विश्वासाने या कार्यालयाशी संपर्क साधावा. आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेकडून सर्वसामान्य नागरीकांना अवश्य मदत केली जाईल", असे संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितले. मोटार साईकल रॅलीमध्ये आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा, सचिव अरुण खुलात, संघटक नितिन दळवी, संतोष जाधव, नाऊ माळी, वाडा तालुका उपाध्यक्ष आदेश पाटील, संतोष जांजर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...