*महाराष्ट्र बचाव देशबचाव जनजागरण मोहीमेस प्रारंभ*
चोपडा, प्रतिनिधी... 14 एप्रिल 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन ते 15 मे 2023 रोजी पर्यंत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजपा सरकारच्या नववर्षाकाळात वाढलेल्या सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नांवर.. महागाई बेरोजगारी विषयावर देशव्यापी जनजागरण मोहीम सुरू केली आहे त्यानुसार चोपडा येथेही आयटक कार्यालयात मोहिमेला प्रारंभ करण्यात आला .सुरुवातीला श्रीमती ललिता सोनवणे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यारपन अर्पण करण्यात आले त्यानंतर *भाजपा हटाव देश बचाव महाराष्ट्र बचाव* हस्त पत्रकांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अमृत महाजन मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गेल्या नऊ वर्षाच्या मोदी सरकारचे कालात भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवले. सरकारचा विरोधी बोलणारा पत्रकारांना जेलात टाकले. याच काळात काँग्रेस गोविंद पानसरे, डॉक्टर दाभोलकर, डॉक्टर कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांचे खून पडले आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कडून सरकारने अब्जावधी रुपयाचे खर्च तिच्या अटी मान्य केल्या, त्यामुळे कामगार कायदे शिथिल करण्यात आले.. कायम नोकरी मिळण्याचे दरवाजे बंद केले शेतीमालाला हमीभाव नाकारण्यात आला. कामगार वेगाने गेल्या 100 वर्षात लढून मिळवलेले हक्क काढून घेण्यात आले. शेती मालाचे भाव पडत आहेत तेव्हा शेतकऱ्यांची लूट आणि कामगारांची पिळवणूक थांबायचे असेल तर *भाजपा हटाव देश बचाव भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव* आंदोलन करण्याची गरज आहे.असे आवाहन केले.
*17 एप्रिल रोजी चोपडा तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर वर्गाचा मोर्चा* आदिवासी नव्हे दावे, घरेलू कामगार श्रावण बाळ योजनेतील प्रकरणे या विषयावर कष्टकऱ्यांचा मोर्चा नेण्यात येणार आहे या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले त्या का श्री दिगंबर माळी, सुमनबाई माळी लिलाबाई चौधरी, दृपदाबाई महाजन, सुखा सदू महाजन, सुनील कोळी, गंगुबाई शेट्टी, सरलाबाई जाधव हे उपस्थित होते
No comments:
Post a Comment