सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी !
सिल्लोड, अखलाख देशमुख : सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झाली. जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार ते पुतळा पर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मिरवणूक मार्गानंतर प्रवेशद्वार जवळ मिरवणूक येताच उत्सव समितीच्या वतीने साकारण्यात आलेली विद्युत रोषणाई , फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशे आणि भीमगीतांच्या तालावर उपस्थित सर्वच जण उत्साहात न्हावून निघाले.
*शिवसेनेच्या वतीने मसाला दुधाचे वाटप*
मिरवणूक मार्गावर शिवसेना - युवासेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्वागतकक्ष उभारून येथे मसाला दूध व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मसाला दुधाचे वाटप केले. यावेळी मिरवणुकीतील नागरिकांनी मसाला दुधाचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच नगर परिषदेच्या वतीने ही ठिकठिकाणी स्वागतकक्ष उभारण्यात आले होते.
मिरवणुकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प.माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, नगर परिषद शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, रमेश साळवे, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख दीपाली भवर, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, शहरप्रमुख मेघा शाह, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, सुधाकर पाटील , बेग चांद मिर्झा, शेख सत्तार हुसेन, रतनकुमार डोभाळ , आसिफ बागवान, सुनील दुधे, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, राजु गौर, जुम्मा खा पठाण, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर , जितु आरके,मोईन पठाण, शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, विशाल जाधव, राजू बन्सोड, संजय मुरकुटे, दत्ता शेजुळ, संतोष धाडगे, अनिल बोरा, अमृतलाल पटेल, युवासेनेचे पदाधिकारी धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, अक्षय मगर, आशिष कुलकर्णी, गौरव सहारे, आशिष कटारिया, फहिम पठाण, राजेश्वर आरके, मनोहर आरके, संदीप आरके, शेख इम्रान, बारकू आरके, अजय आरके, सागर आरके, रोहित आरके आदींसह सिल्लोड शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment