नवी मुंबई खारघर मध्ये.....
.....आता पर्यंतचा सर्वात मोठया "महाराष्ट्र भूषण" सोहळ्यात, 'अप्पासाहेब धर्माधिकारी' यांचा होणार सन्मान, जवळपास २५ लाख दास होणार सहभागी !
भिवंडी, दि,१५,अरुण पाटील (कोपर) :
नवी मुंबईच्या खारघर मधील सेंट्रल पार्क मैदान सज्ज आहे उद्याच्या भव्य दिव्य अशा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी. महाराष्ट्र भूषण २०२२ हा पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील सरकारमधील जवळपास सर्व महत्त्वाचे नेते, मंत्री उपस्थित राहतील. शिवाय या खास कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतचा सर्वात मोठया सोहळ्याने "महाराष्ट्र भूषण" पुरस्कारचे हे आयोजन आहे.
खारघर मधल्या सेंट्रल पार्कच्या मैदानावर ४०० एकर परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार होणार आहे. समाज प्रबोधन, अध्यात्म, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला आहे.या कार्यक्रमासाठी येण्यासाठी सर्व दासाना.अज्ञा देण्यात आल्याने जवळपास २५ लाख श्री सदस्य (अनुयायी) आणि सर्व सामान्य लोक या कार्यक्रमाला या मैदानावर उपस्थित राहणर आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या श्री. दासाना विविध सूचनाही करण्यात आल्या आहेत, त्यात आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले असणाऱ्या महिला, वयस्क श्री/पुरुष, लाहान मुले, यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.
या महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने लक्ष ठेऊन आहेत. शिवाय या कार्यक्रमाची जबाबदारी उदय सामंत, शंभूराज देसाई आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांवर दिली आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण कोकणातील लाखो श्री सदस्य त्यासोबतच त्यांना मानणारा वर्ग खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आप्पासाहेबांना गुरु समान मानतात, देवेंद्र फडणवीस यांचे धर्माधिकारी हे चांगले स्नेही आहेत.
श्रीमत दासबोधाच्या निरुपणातून समाज घडवण्याचं मोठं कार्य धर्माधिकारी कुटुंबाने केलं आहे.वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची दखल संपूर्ण जगातून घेण्यात आली आहे. शिवाय लाखो वृक्ष संवर्धनाचं कार्य त्यांनी केलं आहे. अंधश्रद्धेवर प्रहार, व्यसनमुक्ती, लोकशिक्षण यावर त्यांनी कायम भर दिला
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रस्ते,गाव, वाड्या, शहर,स्मशान भूमी, कब्रस्थान, स्वच्छ करण्याचा दैनंदिन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आयोजित करून समाजकार्य त्यांनी केलं. त्यांचा हे समाजाप्रती काम पाहून अप्पासाहेब. धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने गौरवलं आहे. त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी गेले होते.
No comments:
Post a Comment