Saturday, 15 April 2023

दाभोळ बुरोंडी कुणबी मंच दापोली जिल्हा रत्नागिरीतर्फे ग्रामीण राजकारण आणि समाजकारणवर आधारित "आता उठवू सारे रान..." या नाटकाचे शिवाजी मंदिर येथे आयोजन !

दाभोळ बुरोंडी कुणबी मंच दापोली जिल्हा रत्नागिरीतर्फे ग्रामीण राजकारण आणि समाजकारणवर आधारित "आता उठवू सारे रान..." या नाटकाचे शिवाजी मंदिर येथे आयोजन !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                     दाभोळ बुरोंडी कुणबी मंच दापोली जिल्हा रत्नागिरीच्या वतीने ग्रामीण राजकारण आणि समाजकारण वर आधारित "आता उठवू सारे रान..." या नाटकाचे आयोजन केले आहे. कोकणातील ग्रामसंस्कृतीचे दर्शन आणि जपुया गावचे गावपण वर अतिशय लोकप्रिय होत असलेले धमाल विनोदी नाटक आता उठवू सारे रान चा प्रयोग मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या दादर पश्चिम येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह, प्लाझा सिनेमा समोर, दादर ( पश्चिम ) मुंबई येथे रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित केले आहे. गाव भावकि तसेच समाजातील राजकारणातील सद्य स्थितीत होणाऱ्या वास्तववादी घडामोडीचा मागोवा घेत हे नाटक कोकणातील पर्यटन आणि स्थलांतर वर परिणामकारक भाष्य करते, आपसात, सार्वजनिक जीवनात होणारे समज गैरसमज, वाद विवाद आणि त्यातुन युवा पिढीने उचलेली परिवर्तनाची निर्णायक पाऊले आणि होणारे बदल लोकांना नाटक प्रचंड आकर्षित करीत अल्पवावधीत लोकप्रिय होत आहे, गावात समाजात आपसात लोकांनी वाद विवाद टाळून सलोख्याने बंधुत्व जपून राजकीय सूडबुद्धीची मानसिकता बाजूला ठेऊन सहकार्यची भावना जपावी यासाठी कलेच्या माध्यमातून बोध घेण्यासाठी या नाटकाचे आयोजन केले आहे, येऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि विधानसभा सभा निवडणूक च्या वातावरनात लोकांनी काय भान ठेवले पाहिजे या जागृतीसाठी हे नाटक लोकांनी पाहावे, नुसते पाहून नाही तर तसा त्यांनी विचार करावा या भावनेने नाटक आयोजित केले आहे असे प्रतिनिधीशी बोलताना अनंत फिलसे यांनी सांगितले, लेखक दिग्दर्शक सुनिल माळी आणि आता उठवू सारे रान ची कलाकार तंत्रज्ञ टीम ने साकारलेली ही नाटयकलाकृती कोकणातील प्रत्येक गावाने पहावी अशी आहे.अधिक माहितीसाठी श्री.अनंत फिलसे 9324516524 श्री.गणेश पवार 7506636197 श्री.किरण नाचरे 7499853461 श्री.जनार्दन गोवळे 8691987110 यांच्याशी संपर्क साधवा.

No comments:

Post a Comment

मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं..

मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं.. *मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची नाईक कुटूंबास सांत्वन भ...