अकरा (११) एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी सुटी द्या भाकप ची..मागणी !
चोपडा, प्रतिनिधी... महात्मा फुले जयंतीची ११ एप्रिल रोजी सर्वजिक सुटी जाहीर करा असे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर आयुब पिंजारी व का जे डी ठाकरे, सत्यशोधक समाजाचे काँ शांताराम पाटील, का गोरख वानखेडे , वडती चे माजी सरपंच श्री पुंडलिक कोळी, आर पी आय चे टीकाराम वासनिक, वराड चे माजी सरपंच कोंडाजी गवळी आदींच्या सह्या व उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाचे मंडल निरीक्षक श्री नारखेडे साहेब यांना सादर केले त्यासंबंधी जाहीर केले ल्या पत्रकात म्हटले आहे की.
भारतातील स्त्री, शूद्र, अति शूद्र यांच्या शिक्षणाच जनक महात्मा ज्योतिराव फुले हे असून सन १८५८ मध्ये त्यांनी मुलींची शाळा भिडे वाडा पुणे येथे काढून शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली.
तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढून ती जगाच्या निदर्शनास आणून दिली व शिवरायांचा पहिल्यांदा पोवाडा देखील रचला आहे.. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री, शूद्र, अति शूद्र यांच्या उद्धाराचे आयुष्यभर काम केले अस्पृश्यते विरुद्ध कार्य केले स्री, शूद्र, अतिसुद्र यांना शिक्षणाचे महत्त्व पटावं म्हणून त्यांच्या दारिद्र्याचे कारण अचूकपणे खालील प्रमाणे जाहीर मांडले.
*विद्याविना मती गेली !*
*मतीविना नीती गेली !!*
*नितीविना गती गेली!*
*एवढे सारे अनर्थ अविद्येने केले!!*
त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना करून. सोशन मुक्त व साक्षर शैक्षणिक दृष्ट्या संपन्न नव समाज निर्मितीचे स्वप्न पाहिले, त्यांनी गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब ,शेतकऱ्यांचा आसूड ,आदीं पुस्तकांची निर्मिती केली, पुरोगामी भारताच्या पाया रचणाऱ्यांपैकी ते एक होते.
* *ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाची धरावे पोटाशी ज्योती म्हने-* असेही पंथनिरपेक्ष विचार मांडले
त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती करताना त्यांचे विचार व कार्य नजरेसमोर ठेवून जगात भारताची आदर्श संविधान निर्मिती केली आहे.. त्यांना गुरू देखील मानले तेव्हा म्हणून ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांचा कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने वर्षातून एक दिवस देशभर संपूर्ण जयंती साजरी करावी म्हणून संपूर्ण सुट्टी द्यावी असे नमूद केले आहे
No comments:
Post a Comment