*शहर विकासात ज्यांचे नाव आजही घेतलं जातं असे भरीव योगदान देणारे - डॉ. रफिक झकेरिया*
औरंगाबाद, अखलाख देशमुख : या शहराचं दायित्व सांभाळणारे एक द्रष्टे नेते म्हणून आजही जेव्हा जेव्हा या शहराच्या विकासाचा विषय येतो तेव्हा तेव्हा या नावानंतर एकही नाव आवर्जून घ्यावं असं दिसत नाही. कधी काळी राष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरणातील एक जाणकार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलं. ( संयुक्त राष्ट्रात तीन दा देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.) मूळ कोकणातील असलेल्या झकेरियांनी या शहरातून विधानसभेची निवडणूक लढवली, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये. नंतर सलग तीन वेळा निवडून आले .
➖
नगरविकास खाते भूषवितांना या शहराला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. इथल्या औद्योगिकीकरणाचे ते खरे अग्रणी म्हटले पाहिजेत. या शहराच्या विकासात भरीव योगदान देताना सिडको -हडको ची पायाभरणी, जयकवाडीतून शहराला पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा, इथले आकाशवाणी केंद्र, विमानतळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीची स्थापना, फाईव्हस्टार ग्रेड हॉटेल्स हे सगळं त्यांच्या कार्यकाळात !
➖
आज डॉ. झकेरीया यांचे समरण झाले ते तारखेमुळे आणि शहर विकासाप्रती आस्था असलेल्यांना हे कार्य समजावं म्हणून ! उच्च विद्याविभूषित या लोकप्रतिनिधीने आपल्या ज्ञानाचा आणि पदाचा लाभ या शहराला करून दिला. डाॅ. रफिक झकेरिया ज्यांनी शहराला vision दिलं..विकासाच्या वाटेवर नेलं! त्यांचे योगदान विसरता येणार नाही.
No comments:
Post a Comment