विक्रमगड तालुक्यातील युवकाच्या व्यवसायासाठी जिजाऊ बनली आधारवड !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेने विक्रमगड तालुक्यातील एका तरुणाला व्यवसायासाठी सहकार्य करत त्याचा स्वत:चा व्यवसाय उभे करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वाकडूपाडा येथील अंकुश महाला याच्या स्वत:च्या जिजाऊ प्रिंटर्स या बॅनर बनवण्याच्या व्यवसायाचे नुकतेच जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. अंकुश या होतकरू तरुणाचे उद्योजक बनण्याचे स्वप्न जिजाऊ संस्थेच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.
अंकुश महाला याच्या लहान पासुनच त्याच्या जीवनातील खडतर प्रवासाची सुरुवात झाली.आई आणि वडिलांचे छत्र त्याला खुप कमी मिळालं. त्यामुळे आजीनेच त्याचा सांभाळ करत पहिली ते १० वी पर्यंत शिक्षण दिले. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याकारणाने दहावीच्या पुढच्या शिक्षणात खंड पडला .पुढे उदरनिर्वाह चालवण्यासाठी कंपाउंडर म्हणून ५-६ वर्ष एका डॉक्टरकडे काम केल.
मात्र जाणते झाल्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय उभारावा हे अगदी मनात अंकुश याने ठाम केले होते. या काळात त्याला फोटोग्राफीत रस निर्माण झाला होता. आधी भागीदारीत त्याने हा व्यवसाय सुरु केला. यात त्याला पूर्ण आत्मविश्वास आल्यानंतर पुन्हा उमेदीने पाऊल टाकत अनुराग स्टुडिओ या नवाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. या प्रवासात छंद आणि आवड म्हणून व्यवसायात खूप माणसे जोडली गेली. २०१६ मध्ये एका निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान अंकुश हा जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थाशी जोडला गेला. विक्रमगड -जव्हार -मोखाडा या भागांतील जिजाऊ संस्थेच्या आरोग्य शिबिरांना तो फोटोग्राफर म्हणून काम करत जिजाऊ संस्थेचे कार्य जवळून पाहता आले. “समाजासाठी असलेली निलेश सांबरे यांची तळमळ बघून खुप छान वाटायचं व अधिक जिजाऊ बरोबर जोडलो गेलो.” असे अंकुश सांगतो.
जिजाऊचे संस्थापक सांबरे यांना देखील या तरुणांतील मेहनतीपणा आणि चिकाटी भावली. त्याच्या व्यवसायासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि दिलेला शब्द पाळला देखील, जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी वाकडूपाडा येथे अंकुश महाला यांच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिजाऊ प्रिंटर्स कंपनीचे नुकतेच उद्घाटन केले आणि या व्यवसायात अंकुशला भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या. मराठी तरुणांनी व्यवसायात पुढे यावे जिजाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल आश्वासन याप्रसंगी सांबरे यांनी दिले.
“सांबरे साहेबांनी वडिलांची माया देत नवीन उद्योजक घडावा या संकल्पनेतून माझ्या व्यवसायाला अधिक उभारणी दिली आहे. पारस जसे लोखंडाचे सोनं करतो तसेच सांबरे साहेब आहेत मी निलेश सांबरे साहेबांचा (आप्पाच्या) आजन्म ऋणी राहीन” अश्या भावना यावेळी अंकुश महाला यांनी बोलताना व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment