Friday, 7 April 2023

राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्याने संतापले काँग्रेस कार्यकर्ते !

राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्याने संतापले काँग्रेस कार्यकर्ते !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

      सत्ताधारी केंद्राच्या राजवटीत असलेल्या भाजपा मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्ष आता चांगलाच आक्रमक झाला आहे. मोदी सरकार मधील चोर, दरोडेखोर, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी मंञ्यांचा, उद्योगपतींचा घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या राहुल गांधीना मोदी सरकार कडून जाणीवपूर्वक सूडबुध्दीने त्यांच्यावर कारवाई  झाल्याने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात जव्हार काँग्रेस पक्षाने पाचबत्ती नाका येथील फकरुद्दीन मुल्ला यांच्या  कार्यालयात पञकार परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी पञकारांसमोर पालघर जिल्हा आदिवासी सेलचे अध्यक्ष बळवंत गावित यांनी मोदी सरकारच्या कृत्याचा पाढा वाचत भाजपाचा निषेध केला. ते म्हणाले कि राहुल गांधीनी संसदेत अदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर ९ दिवसांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा करुन त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात येऊन २४ तासांत त्यांची खासदारकी रद्द केली व शासकीय निवास खाली करण्याची नोटीस पाठवली होती. हे मोदी सरकारचे कृत्य लोकशाहीची निती मुल्यांची पायमल्ली करणारे आहे. केंद्रातील भाजपाच्या जुलमी, अत्याचारी सत्तेला काँग्रेस पक्ष घाबरत नाही तर मोदी सरकारला का घाबरेल ? अशा टोला ही त्यांनी लगावला.
      अदानी घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून राहुल गांधीवर खोटे आरोप लावुन जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. मात्र मोदी सरकार संसदेचे कामकाज चालू देत नाही. अशी खंत बळवंत गावितांनी मांडली. परंतु काँग्रेस पक्षाची हि लढाई लोकशाही, संविधान व देश वाचविण्यासाठी सुरू आहे. सद्या देशात वाढती बेकारी, महागाई, गँस, पेट्रोल, डिझेलचे सातत्याने वाढणारे दर याला भाजपाच्या राजवटीत सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. त्यामुळे २०२४ च्या भावी निवडणुकीत जनता भाजपाला धडा शिकवुन काँग्रेस पक्षाला कौल देईल अशा विश्वास कार्यकर्त्यांनी पञकार परीषदेत मांडला.
     पञकार परिषदेप्रसंगी उपस्थित मान्यवरांत पालघर जिल्हाआदिवासी सेलचे अध्यक्ष बळवंत गावित, मधुकरराव चौधरी वरिष्ठ उपाध्यक्ष पालघर जिल्हा, जव्हार तालुका काँग्रेस  अध्यक्ष संपत पवार तसेच, तालुका सरचिटणीस परशुराम गावित, सदस्य शैलेश कामडी, सोनू भोये आदी काँग्रेस पक्षाचे  कार्यकर्ते व पञकार आर्वजुन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...