Friday, 7 April 2023

राह फाउंडेशन मार्फत महीलांना शिलाई मशिन प्रशिक्षण !

राह फाउंडेशन मार्फत महीलांना शिलाई मशिन प्रशिक्षण !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून राह फाउंडेशन यांच्या मार्फत महिलांसाठी कौशल प्रशिक्षण म्हणून शिलाई मशीन प्रशिक्षण चालू करण्यात आले असून याच्या उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत, ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे, ग्राम.सदस्य नितीन टोकरे सामाजिक कार्यकर्ते भाऊ गडगे व राह फाउंडेशन चे कर्मचारी व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या प्रशिक्षणातून महिलांना त्यांच्या पुढील काळात  व्यवसायात संधी निर्माण होऊन महिलांना एक रोजनार उपलब्ध होण्यास मदत होऊन महिला रोजगाराकडे वळतील, अशाच प्रकारचे नवीन नवीन उपक्रम राबवून महिलांना कसा रोजगार निर्माण करता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशिल राहणार आहोत.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...