लासलगाव ला हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन !
लासलगाव, अखलाख देशमुख, दि ७ : येथे महादेव मन्दिर येथे होणाऱ्या हनुमान चालीसा पाठ साठी मुस्लीम बांधवांनी आपली 8:30 ला सुरू होणारी ईशा व तरावीह नमाजला 8:00 लाच सुरवात केली तर हिंदू बांधवांनी ईशा व तराबी नमाज साठी 9:00 वाजता सुरू होणाऱ्या हनुमान चालीसा पाठणाला 9:30 ला केली सुरवात.
हनुमान जयंती निमित्त हनुमान चालीसा झाल्यानंतर हिंदू बांधवान साठी मुस्लिम बांधवांकडून सरबत वाटप करण्यात आले सर्वांनी सरबत घेऊन हिंदू व मुस्लीम एकताचा दिला संदेश व नात्यातील गोडवा वाढवला.
No comments:
Post a Comment