"निंभोरा मोटारसायकली चोरी प्रकरण" तिघांची हर्सूलला रवानगी ; तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत !
सोयगाव, दिलीप शिंदे, ता.०४... पळाशीच्या मोटारसायकल चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याची सोयगाव पोलिसांनी उकल करून त्यात तीन आरोपींना अटक केली होती त्यांच्याकडून तपासात चोरीच्या तीन मोटारसायकली वाडी (सुतांडा) आणि निंभोरा शिवारात लपवून ठेवल्याची कबुली देताच त्यांच्याकडून तीन मोटारसायकली अंदाजे किंमत एक लक्ष ६५ हजार जप्त करून आरोपी समीर मोहम्मद शहा (वय १८) दीपक कैलास जाधव (वय२१) आणि अजय रामचंद्र पाटील (वय २०) (सर्व रा. निंभोरा ता सोयगाव) या तिघांना सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे
-----असा लागला तपास
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पहुरी येथील शिवाजी जाधव यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ( ता.२५) मार्चला त्यांची पन्नास हजार रु किमतीची एक मोटारसायकल चोरी झाल्याची फिर्याद दिली त्यावरून सोयगाव पोलिसांनी तापासचक्रे गतिमान केली असता त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निंभोरा येथील तिघे संशयितांनी या मोटसायकलची चोरी केल्याची माहिती मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी विशेष तपास पथक नियुक्त केले या तपास पथकांनी या तिघांवर पाळत ठेवून सबळ पुरावा गोळा करून या प्रकरणी दरम्यान या तिघांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिल्यावरून त्यांनी अधिक चोरीच्या मोटारसायकली त्यांनी लपवून ठेवल्याची कबुली दिल्यावर त्यांच्याकडून अंदाजे किंमत एक लाख ६५ हजार रु किमतीच्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलोस निरीक्षक अनमोल केदार, रवींद्र तायडे, जमादार राजू बर्डे, सादिक तडवी आदींच्या पथकांनी ही कारवाई केली आहे...
No comments:
Post a Comment