कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळपाडा ते वरपगांव दरम्यान चारलेन चे काम पुर्णत्वाकडे, सेक्रिड हार्ट स्कूलच्या व्यवस्थापकांच्या पाठपुराव्याला यश !
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या ७/८ महिन्यापासून चिखल, धुळ, खड्डे, अपघात, मृत्यू, आदी विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलेल्या कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते वरपगाव दरम्यानच्या रस्त्याचे काम लवकरच पुर्ण होणार असून संपूर्ण ४ लेन कार्यान्वित होणार आहे. यांचे सर्व श्रेय वरप येथील सेक्रिड हार्ट स्कूलचे व्यवस्थापक अलबिन सर यांच्या सह वरप, कांबा, म्हारळ मधील ग्रामस्थांना दिले गेले पाहिजे.
कल्याण नगर महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल पर्यत सिंमेट काँक्रीटीकरण रस्ता मंजूर झाला आहे. हे काम वाधवा यांच्या पी सीसी कंपनीने सुमारे ३१ करोड ५३ लक्ष रुपयांला घेतले आहे. दरवर्षी खड्डे, पाणी भरून वाहतूक कोंडी, आदी विविध संकटातून मुक्त होण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. असे असताना या रस्त्याचे ठेकेदार मनिष वाधवा यांनी सुरुवातीपासून हे काम ज्या गतिने व्हायला हवे तसे केले नाही, उलट अतिक्रमण, माल नाही, मजूर नाही, मशीन आँफरेटर नाही, आदी विविध प्रकारची कारणे पुढे केली. त्यामुळे अपुऱ्या व अर्धवट कामामुळे धुळ, खड्डे, चिखल, सांडपाणी यामुळे रस्त्याची गटारगंगा झाली. यातून मोठी वाहने रस्त्यातच बंद पडू लागली, अनेक मोटारसायकल स्वार स्लिप होऊन पडले, जखमी झाले, फँक्चर झाले ३/४ लोकांना जीव गमवावा लागला, कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवीत व वित्तहानी याचा धोका निर्माण होऊ लागला.
त्यामुळे या विरोधात मार्चे, अंदोलने,उपोषण, तक्रारी होऊ लागल्या. आमदार कुमार आयलानी यांनी मध्यस्थी करून ठेकेदाराला समज दिली, परंतु निर्ढावलेला ठेकेदार व गेड्यांच्या कातडीचे अधिकारी यांच्यात काही फरक पडला नाही. उलट ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ७० टक्के काम होणे अपेक्षित असताना ते केवळ २७ टक्केच झाल्याचे समोर आले. त्यामुळे या मार्गावर होणारे वाढते अपघात, वाहतूक कोंडी, धुळीमुळे श्वसनाचे आजार, सुरक्षेचा अभाव, ग्रामस्थांना होणारा त्रास, मनस्ताप, या सर्व बाबींचा विचार करून वरप येथील सेक्रिड हार्ट स्कूलचे व्यवस्थापक अलबिंन सर यांनी म्हारळ, वरप, कांबा, येथील ग्रामस्थ, रिक्षाचालक, नागरीक यांच्या सहभागातून ठेकेदार मनिष वाधवा व प्रशासनाच्या विरोधात एक लढा उभा केला.
रस्त्यावरील खड्डे बुजवणे, रस्ता रोको, खड्ड्यात, गटारात बसून अंदोलन करणे आदी विविध प्रकारे शासनाचे लक्षवेधून घेतले. वास्तविक हे काम विविध राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्ते यांचे असताना शाळेचे शिक्षक करत होते. त्यामुळे राजकीय पक्षासह शासनाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत होती. म्हारळ, वरप, कांबा हा भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात येत असल्याने अलबिन सर व काही ग्रामस्थांनी खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठेकेदार वाधवा व नँशनल हायवे अँथोरटी च्या अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. व म्हारळपाडा ते वरपगाव पर्यंत चे काम जयभारत कंपनीचे अमित चंदणानी या ठेकेदाराला करायला सांगितले.
त्यांनी ताबडतोब म्हारळपाडा ते वरपगाव दरम्यान च्या अडचणी, प्रश्न, समस्या जाणून घेऊन कामाला जोरदार सुरुवात केली. सुरुवातीला २ लेन असणारा हा मार्ग आता ४ लेनचा झाला आहे. चौथी लेन सुरू देखील झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार, मध्ये डिव्हाडर आदी काम सुरू आहेत.
तर टाटा पावर हाऊस पासून ते पाचवामैल पर्यंत हे काम पीसीसी कंपनीचे वाधवा हे करत आहे. परंतु त्यांच्या कडून अद्याप केवळ दोन लेन चे काम सुरू आहे तेही पुर्ण झाले नाही व कधी होईल हे सांगता येत नाही. परंतु म्हारळपाडा ते वरपगाव ग्रामस्थांना मात्र येत्या १५ दिवसापर्यंत ४ लेन पुर्ण मिळणार आहे. त्यामुळे, खड्डे, धुळ, अपघात, नादुरुस्त गाड्या, यातून वाहनचालक, प्रवासी, नागरिक, जनता, शाळेचे विद्यार्थी, यांची सुटका होणार आहे. यामुळेच सेक्रिड हार्ट शाळेचे व्यवस्थापक अलबिंनसर यांनी म्हारळ, वरप, कांबा, तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, वाहनचालक, नागरिक यांच्या वतीने आमदार कुमार आयलानी, खा डॉ, श्रीकांत शिंदे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment