सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस "शिक्षण दिवस" म्हणून
साजरा करण्यात यावा !
३ जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांचा जन्मदिवस असून तो दिवस संपूर्ण देशभरामध्ये शिक्षण( एज्युकेशन) दिन म्हणून साजरी करण्यात यावा याकरिता शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले .ही संकल्पना शहर जिल्हा महिला अध्यक्षा कु. दिपाली लालाजी मिसाळ यांची असून सोबत काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर पवन डोंगरे, शहर जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल मालोदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नांगरे , शहर जिल्हा अनुसूचित महिला अध्यक्षा शीला मगरे, पश्चिम विधानसभा महिला अध्यक्ष रुबीना सय्यद, विद्यार्थी काँग्रेसच्या दीक्षा पवार, अनुसूचित जाती विभागाचे कृष्णा भंडारे, शहर महिला उपाध्यक्ष चंद्रप्रभा खंडारे, शहर महिला प्रशासकीय महासचिव निर्मला शिखरे, अलंकृत येवतेकर, मुनीर पटेल, अनुसूचित विभागाचे उत्तम दणके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ज्या देशांमध्ये स्त्री ही शिक्षणापासून वंचित होती ,शिक्षण स्त्रीकडे नसल्यामुळे ती समाजातल्या तिच्या अधिकारापासून ती दूर होती अशा वेळेस क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यामुळे आज आम्ही सर्व भगिनी सर्व क्षेत्रांमध्ये सक्षमरिता कार्य करत आहोत. आम्हाला घडवण्यामागे हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा हात आहे यांचा त्याग आहे त्यामुळे ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस असून तो संपूर्ण देशभरात शिक्षण दिवस म्हणजे एज्युकेशन डे म्हणून साजरी करण्यात यावा. असे शहर जिल्हा महिला अध्यक्षा दिपाली मिसाळ म्हणाल्या.
No comments:
Post a Comment