शिवसेना शाखेचा नागरिकांना कायम आधार - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
*शांतीपुरा, नंदनवन कॉलनी येथे शाखा फलकाचे अनावरण*
शिवसेना शाखा हे प्रत्येक वॉर्डात, गावात नागरिकांचे हक्काचे कार्यालय असते. या शाखेच्या माध्यमातून सेवा, सुरक्षा आणि विकास साधला जातो. त्यामुळे या शाखेच्या माध्यमातून जनहिताची कामे करा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
संभाजीनगर येथील शांतीपुरा, नंदनवन कॉलनी येथे शाखा नामफलकाचे अनावरणप्रसंगीते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी शाखा उदघाटनप्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, किशोर कच्छवाह, विभागप्रमुख नरेश मगर, उपविभागप्रमुख गणेश मुळे, शाखाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, शांतीपुरा, नंदनवन कॉलनी शाखाप्रमुख राजेश रानडे, प्रवीण अवसरे, सुनील गवळे, जोसेफ पाटोळे, दादासाहेब लोखंडे, उपशाखाप्रमुख सुरेश भुजबळ, पिटर पवार, प्रभाकर वाघमारे, राजू निर्मळ, जॉन पाटोळे, हेमंत ससाणे, अण्णा बोरगे, प्रीतम अर्नाजलम, नरेश सुरग, मनिष आवटे, महिला आघाडीच्या शोभा बडे, मीना यादव, सुनंदा गवळे, सुमन घोडके आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment