Wednesday, 5 April 2023

डॉ.रुचिता बोलाडे " नॅशनल लेव्हल वुमन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड-२०२३" ने नवी मुंबई येथे सन्मानित !

डॉ.रुचिता बोलाडे " नॅशनल लेव्हल वुमन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड-२०२३" ने नवी मुंबई येथे सन्मानित !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

         होली फॅमिली हायस्कूल,पेस्तम सागर, चेंबूर येथील सहाय्यक शिक्षिका डॉ.रुचिता राजेंद्र बोलाडे " नॅशनल लेव्हल वुमन  ऑफ एक्सलन्स अवॉर्ड- २०२३ "हा पुरस्कार नवीमुंबई येथील कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई द्वारे जागतिक महिला दिनाचे औचित्य  साधून नुकताच  सिने अभिनेते जॉनी रावत (चला हवा येऊ द्या ), निवृत्त शिक्षण उप संचालक सुरेश माळी, संगीत दिग्दर्शक रेडकर, सिने अभिनेत्री सविता हांडे, सामाजिक कार्यकर्ते, सिने गीत लेखक समृद्धी पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सौ.रुचिता बोलाडे या शिक्षिका तसेच वास्तु विशारद असून त्यांना हा पुरस्कार शिक्षण  व साहित्यिक क्षेत्रातील योगदान विषयी प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा कराडी हॉल, कामोठे, नवी मुंबई येथे पार पडला.स्मृतिचिन्ह सन्मानपत्र पुस्तक गोल्ड बॉर्डर असे पुरस्काराचे स्वरूप आहे.बोलाडे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक तसेच कुणबी समाज संघ मुंबई आणि श्री. अविनाश राणे विभाग प्रमुख श्री.भास्कर चव्हाण आदींनी रुचिता बोलाडे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...