Tuesday, 11 April 2023

शेताच्या बांधावर जाऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला !

शेताच्या बांधावर जाऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला ! 

अकोला/ बुलढाण, अखलाख देशमुख, दि ११ : विदर्भातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. शेताच्या बांधावर जाऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

          अकोला जिल्ह्यातील बेलोरा, वाडेगाव, बाग फाटा, पारस, तर बुलडाणा जिल्ह्यातील चितोडा, हिंगणा आणि कोलवड शिवारात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबू, कांदा, मका, तसेच भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहता कामा नये तसेच पंचनामा करतांना दिरंगाई करणाऱ्या‌ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
या पाहणी दौऱ्यात खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर,  माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अकोला प्रभारी जिल्हाधिकारी सौरव कटियार, अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, बुलडाणा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, तसेच अकोला शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील, अश्विन नवले, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मानकर,  संदीप पाटील, योगेश बंदले यांच्यासह महसूल, ग्रामविकास , कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...