Tuesday, 11 April 2023

कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड टिटवाळा यास संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होणार !!

कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड टिटवाळा यास संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होणार !!

कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जंयती कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, टिटवाळा, यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम, लोकशिक्षण, लोकजागृती, मनोरंजन आणि भव्यदिव्य मिरवणुका अश्या कार्यक्रमाने साजरी होणार आहे, यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोना मुळे जवळपास सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता तशी परिस्थिती नसल्यामुळे या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जंयती धुमधडाक्यात व जोरदार साजरी होणार आहे. कल्याणात तर एप्रिल महिन्याला प्रांरभ होताच जागोजागी जयंती शुभेच्छांचे बँनर लागले आहेत, कल्याण मुरबाड रोड, कल्याण भिवंडी रस्ता, कल्याण टिटवाळा, कल्याण अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पनवेल अशा सर्वच रस्त्यावर बँनरबाजी सुरू झाली आहे. निळे झेंडे, कमानी, प्रवेशद्वार, छोटे फलक, अशा वातावरणामुळे संपूर्ण कल्याण निळे मय झाले आहे.
तालुक्यातील अनेक मंडळे, संस्था, बचतगट,पक्ष, संघटना, यांनी विविध शैक्षणिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, साहित्य वाटप, भोजनदान, प्रबोधनात्मक,व्याख्याने, तर कुठे महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, यांचे भिमगितांचे आयोजन करण्यात आले आहे. 

घरोघरी साफसफाई, रंग रंगोटी, लाइटिंग, आकाश कंदील, निळे झेंडे, आदी लावण्याची तयारी सुरू झाली आहे. तर सायंकाळी, कल्याण, वालधुनी, बिर्ला काँलेज, मोहना, बल्याणी, टिटवाळा, उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ, म्हारळ, वरप कांबा, बदलापूर या परिसरात भव्य दिव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत.संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्यात साजरी होणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती म्हणजे समस्त भिम अणुयायांसाठी हा दिवस दिवाळीचा सण असतो, तो शांततेत पार पाडावा असे अवाहन अनेक जेष्ठ भिमसैनिकानी केले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...