अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार _मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे
भिवंडी, दि,९, अरुण पाटील (कोपर)
अयोध्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लश्र लागून आहे. दरम्यान, अयोध्येत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र करत मोठी घोषणा केली असून त्यांनी अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र काही वेगळा नाही, असं विधानही त्यांनी केलं. याआधी देखील एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, जे पंतप्रधान मोदींनी पवित्र भूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले. संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत. काही लोकांना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह हेही अयोध्येत पोहोचले. देवेंद्र फडणवीस प्रार्थना करून लखनौला रवाना झाले आहे. तर मुख्यमंत्री शिंदे मुक्काम करून शरयू नदीच्या काठावर सायंकाळच्या महाआरतीत सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment