पतीला भित्रा, बेरोजगार म्हणणे मानसिक क्रूरता -- उच्च न्यायालय, कोलकात्ता
भिवंडी, दिं,९, अरुण पाटील ((कोपर)
पत्नीने पतीला आई-वडिलांपासून वेगळे होण्यास भाग पाडणे व त्याला कोणत्यान कोणत्या कारणाने त्याला भित्रा आणि बेरोजगार म्हणणे मानसिक क्रूरता आहे. या क्रूरतेचा सामना करणार्या पतीला घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो, असे कोलकात्ता उच्च न्यायालयाने नुकत्याच घटस्फोट प्रकरणी दाखल याचिकेवरील निकालावेळी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील मिदनापूर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीकडून होणार्या मानसिक छळाच्या आधारे २ जुलै २००१ रोजी पतीला घटस्फोट मंजूर केला होता. या निकालाविरोधात पत्नीने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सौमेन सेन आणि उदय कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनवणी सुरु होती.
कौटुंबिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना न्यायमूर्ती सौमेन सेन आणि उदय कुमार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, पतीने आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहावे अशी संबंधित पत्नीची इच्छा होती. भारतीय कुटुंबातील मुलाने लग्नानंतरही आपल्या आईवडिलांसोबत राहणे ही एक सामान्य प्रथा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडिलांना सांभाळणे हे मुलाचे आद्य आणि धार्मिक कर्तव्य मानले जाते. पत्नीने मुलाला समाजातील प्रचलित प्रथेपासून वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगणे यासाठी ठोस कारण असणे आवश्यक आहे.”
पत्नीने तिच्या वैयक्तिक डायरीमध्ये पतीविषयी नमूद केलेल्या मताची या वेळी उच्च न्यायालयाने दखल घेतली. पत्नीने डायरीत नमूद केले होते की, ‘मी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो भित्रा आहे. त्याचा मला तिरस्कार आहे. बेरोजगार व्यक्तीशी लग्न करण्यास माझी संमती नव्हती. मात्र आई-वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावले’.
खंडपीठाने स्पष्ट केले की, डायरीतील मजकुरावरुन संबंधित पत्नीला दुसरीकडे लग्न करायचे होते. ती तिच्या लग्नावर खूश नव्हती. तरीही पतीने तिच्याशी जुळवून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला,
No comments:
Post a Comment