Monday, 24 April 2023

कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली च्या निवडणुकीत आप सक्रीय‌ !

कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली च्या निवडणुकीत आप सक्रीय‌ !

*कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीच्या निवडणूकीत अशोक गावडे, उमर बागवान यांना आम आदमी पार्टी चा पाठींबा* 

पुणे/ हवेली, अखलाख देशमुख दि २४ : कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली पुणेची निवडणूक दिनांक २८ एप्रिल रोजी आहे. या निवडणुकीनिमित्ताने बाजार समिती कामकाजामध्ये सुद्धा काही चांगले बदल व्हावेत अशी आम आदमी पार्टीची इच्छा आहे. 

श्री अशोक रामभाऊ गावडे हे गेले ४० वर्षे केळी व फळ विक्रीचा व्यवसाय गुलटेकडी मार्केट यार्ड येथे करीत आहेत. व्यापारी आडते आणि किरकोळ विक्रेते यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहेत तसेच गणेशोत्सव व इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. त्यांचे चिन्ह मोरपीस आहे.

मा उमर बागवान हे हडपसरचे रहिवासी व फळविक्रेता व्यवसायिक असून हातगाडी फेरीवाले पथविक्रेते याच्यासाठी संघर्ष करणाऱ्या जाणीव संघटनेचे ते कार्यवाह आहेत. बाजार समितीमध्ये आजवर किरकोळ व्यापारी पथविक्रेते यांच्या प्रतिनिधीला स्थान मिळालेले नव्हते. ते मिळावे यासाठीच आपण या चळवळीतील कार्यकर्त्याला पाठिंबा देत आहोत. त्यांचे चिन्ह टेलिव्हिजन आहे.

हे दोन्ही उमेदवार व्यापारी आडते मतदारसंघातून निवडणूक लढवत असून अखिल भारतीय जाणीव संघटनेने त्यांना पुरस्कृत केलेले आहे.

आम आदमी पार्टी सुद्धा सामान्य माणसाचे जनजीवन सुधारावे त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत, त्याचा विकास व्हावा यासाठी प्रतिबद्ध आहे. दिल्ली पंजाब येथील उत्तम कामगिरीनंतर आम आदमी पार्टीला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. महाराष्ट्रातही आम आदमी पार्टीचे जोरदार घोडदौड चालू आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीच्या *आडते व्यापारी मतदारसंघ निवडणूकीमध्ये अशोक गावडे (चिन्ह मोरपीस) आणि उमर बागवान (चिन्ह टेलिव्हिजन) यांना आपला पाठिंबा जाहीर* करीत असून त्यांना मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन करीत आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...