डोंबिवलीत रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पहिल्या प्रियकराची दुसऱ्या प्रियकरा सोबत मिळून केलि हत्त्या !
भिवंडी, दि,२४, अरूण पाटील (कोपर) -
लिव्ह इनरिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या प्रियकराची हत्या केल्याची घटना डोंबिवली जवळील कोळेगावमध्ये परवा (शनिवारी) घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून प्रेयसीसह दुसऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली.
प्रियसी संध्या सिंह आणि प्रियकर गुड्डू शेट्टी असे अटक आरोपींची नावे आहेत. मारुती हंडे असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संध्या सिंह ही मारुती हंडे यांच्या सोबत विवाह न करता 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये डोंबिवलीत कोळेगाव मधील एका चाळीत राहत होती. त्यानंतर संध्या हिचे आरोपी गुड्डू शेट्टी बरोबरही प्रेमसंबंध जुळल्याचा संशय मारुतीला होता. यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. दरम्यान, शनिवारी २२ एप्रिल रोजी संध्याचा दुसरा प्रियकर गुड्डू घरात असताना संध्या आणि मारुती यांच्यात भांडण झाले. यावेळी गुड्डु आणि संध्याने मिळून मारुती यास मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला.
युवकाची हत्या झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी मारुतीच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी संध्या सिंह आणि तिचा दुसरा प्रियकर गुड्डू शेट्टी या दोघांना अटक केली आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप'ला कायदेशीर आधार दिला गेला असला तरी या नात्याचा उपयोग अनेकवेळा चुकीच्या कामांसाठी केला जातो. यात ९० टक्के 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या नात्यात शारीरिक संबंध आणि फसवणूक हाच मुख्य उद्देश असतो. अनामिक नात्याच्या या प्रवाहात फक्त महिलाच नव्हे तर अनेक वेळा पुरुष देखील आभासी नात्याच्या जाळ्यात अडकून गंडवले जातात.
सद्या विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून हा बाजार जोर पकडत असल्याचे दिसून येत आहे. काही विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांनी 'लिव्ह इन रिलेशनशीप'साठी नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विवाह बंधनात अडकण्याऐवजी केवळ 'लिव्ह इन'मध्ये राहून फक्त शारीरिक भूक भगवण्यासाठीच जास्त पसंती दिली जात आहे.
.
No comments:
Post a Comment