Friday, 7 April 2023

सुप्रसिद्ध सेंच्युरी रेआँन कंपनीशी सल्लंघ्न असलेल्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेंन्ट कडून कांबा पावशेपाडा ग्रामस्थांशी घोर निराशा, ग्रामपंचायतीकडून नोटीस ?

सुप्रसिद्ध सेंच्युरी रेआँन कंपनीशी सल्लंघ्न असलेल्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेंन्ट कडून कांबा पावशेपाडा ग्रामस्थांशी घोर निराशा, ग्रामपंचायतीकडून नोटीस ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झालेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीत पावशेपाडा येथे सुमारे २५ हेक्टर ३६ गुंटे इतक्या जागेवर निर्माण होत असलेल्या जगप्रसिद्ध बिर्ला उद्योग समुहाच्या सेंच्युरी रेआँन कंपनीशी सल्लंघ्न असलेल्या बिट्स स्कूल आँफ मँनेजमेंन्ट तर्फे जागतिक स्तरावरील विद्यापीठ बांधकाम दरम्यान या परिसरातील ग्रामस्थांना दिलेली लेखी आश्वासने न पाळणा-या या कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप पसरला असून विविध ग्रामसभांना उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या व्यवस्थापनाविरोधात कांबा ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा वाद अधिक तीव्र होऊ शकतो.

कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा येथील भूमापन क्रं, ९,१०,११,१२,१३,३३ आणि ३१ या सुमारे २५ हेक्टर ३६ गुंटे जागेवर जागतिक स्तराच्या विद्यापीठाचे बांधकाम सुरू आहे, जगप्रसिद्ध बिर्ला उदयोग समुहाच्या सेंच्युरी रेआँन कंपनीशी सल्लघ्न असलेल्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेंन्ट या संस्थेतर्फे हे बांधकाम सुरू आहे. हे करताना जागा बिनशेती एन ऐ, सरंक्षक भिंत व बांधकाम, उल्हास नदीचे पाणी, रस्ता क्रास करण्यासाठी ब्रिज, उच्चदाब विद्युत वाहिनी, विद्युत जोडणी, आदीसाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशी विंनती केली होती.

याशिवाय कांबा गावातील गावदेवी मंदिर बांधण्यासाठी तसेच पाण्याच्या प्रश्नासाठी योग्य ती मदत, मटेरिअल, अथवा कंत्राट देणे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील मुलांना त्यांच्या गुणवत्तेनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल व विद्यापीठातर्फे एखाद्या विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. दरम्यान या बांधकामामुळे ग्रामपंचायतीस कररुपाने ७५ लाख रुपये मिळणार आहे. असे सांगून या विद्यापीठामुळे कांबा गावाचे नाव जागतिक पातळीवर पोहचणार आहे असे बिट्स स्कुल आँफ मँनेजमेंन्ट यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

परंतु या बाबतीत ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांची मोठी निराशा झाली आहे. गावाच्या पाणी पुरवठा योजनेकरिता २१ लक्ष रुपये देण्यात आले आहे. असे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र इतर बाबी बाबत हे मँनेजमेंन्ट ग्रामपंचायतीला मानत नाही, या जागेत माती उत्खनन करण्यासाठी केवळ १०० ब्रासची परवानगी कल्याण तहसील कार्यालयाकडून देण्यात आली असताना प्रत्यक्षात हजोरो ब्रास माती उत्खनन व भरणी केली आहे असा आरोप पावशेपाडा येथील माझी पोलीस पाटील संजय भोईर यांनी केला आहे, तशी तक्रार ही केली आहे.

तर पावशेपाडा हे गाव उल्हास नदीच्या काठावर असल्याने व आता या संस्थेने शेकडो एकर जागेवर भराव टाकल्याने आमची घरे पुराच्या पाण्यात बुडणार आहेत, त्यामुळे आमचे जीवीत व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होणार आहे अशी भिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भगत यांनी व्यक्त केली आहे.
या सर्व ग्रामस्थांच्या अडचणी प्रश्न, समस्या व संतापाला उत्तर देण्यासाठी कांबा ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली व बिट्स स्कुल मँनेजमेंन्ट ला उपस्थित राहण्यास सांगितले. परंतु आम्ही आपणांस बांधिल नाही असे म्हणून येण्याचे टाळले, असे प्रकार वारंवार होऊ लागल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेविका श्रीमती सुनंदा पाटील यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अखेरीस ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व म्हणजे १२ सदस्यांनी एकमताने सेच्युरी च्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेंन्ट ला दिलेले विविध ना हरकत दाखले रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यानंतही या संस्थेने ग्रामपंचायतीचे अधिकारी मानले नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान या सर्व घटना विषयी बिट्स स्कुल आँफ मँनेजमेंन्ट यांची बाजू ऐकण्यासाठी बिर्लागेट व पावशेपाडा येथील कंपनीमध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता येथील सिक्युरिटी यांनी असहकार्य करून उडवाउडवीची उत्तरे दिली. एकूणच या कंपनीविरोधात पावशेपाडा ग्रामस्थांमध्ये भयंकर असंतोष पसरला आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...