भाईंदर मध्ये केस छोटे कपाल्याच्या नाराजीतून १३ वर्षीय मुलाने मारली १६ व्या मजल्यावरून उडी !
भिवंडी, दि,७, अरुण पाटील (कोपर) :
भाईंदर (ठाणे) मध्ये इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. भाईंदर भागात राहणारा हा मुलगा केस छोटे कापल्यामुळे नाराज होता. त्यामुळे त्याने बाथरूमच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलगा न्यू गोल्डन नेस्ट भागातील सोनम इंद्रप्रस्थ इमारतीत राहत होता. त्याचे नाव शत्रुघ्न पाठक होते. रात्री ११•३० च्या सुमारास तो इमारतीच्या परिसरात रक्तबंबाळ स्थितीत आढळला.
१३ वर्षीय शत्रुघ्न आपल्या चुलत भावासोबत कटिंग करण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर केस छोटे कापल्यामुळे तो नाराज होता. त्याचा हेअरकट त्याच्या मनासारखा झाला नाही. त्याच्या आई-वडिलांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण शांत झाला नाही.
घरातील सदस्य इतरत्र गेल्यानंतर त्याने बाथरूममध्ये जाऊन तेथील खिडकीतून उडी मारली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्या पडण्याचा आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली. तिथे शत्रुघ्न रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
शत्रुघ्न ३ भावंडांत सर्वात छोटा होता. त्याला २ मोठ्या बहिणी आहेत. नवघर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली आहे.
No comments:
Post a Comment