Sunday, 16 April 2023

केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात डोंबिवलीत (पश्चिम) येथील महात्मा गांधी उद्यान येथे शांतीपूर्ण आंदोलन !

केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात डोंबिवलीत (पश्चिम) येथील महात्मा गांधी उद्यान येथे शांतीपूर्ण आंदोलन !

डोंबिवली, प्रतिनिधी, दि. १६ :  दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य, मोफत वीज, पाणी व महिलांना प्रवास देण्याचे कार्य मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी करत आहे,  तर अडाणी सारख्या भ्रष्ट उद्योगपतींची पाठराखण करणारे केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. आज देश-विदेशात आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकार ची स्तुती होत आहे. दिल्ली सरकारच्या चांगल्या कामाची तुलना भाजप शासित राज्यांच्या सरकारशी होत आहे. मा. अरविंद केजरीवाल जींनी विचारलेल्या कठीण प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय)  आज रविवार दिनांक १६ एप्रिल, २०२३ रोजी मा. अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे वेळ प्रसंगी मा. अरविंद केजरीवालांना तुरुंगात टाकून भाजप कडून दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार बरखास्त केले जाऊ शकते.

*या दमनकारी भाजप सरकार चा निषेध करण्यासाठी आज रविवार दिनांक १६ एप्रिल, २०२३ रोजी आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली तर्फे संविधानिक मार्गाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर शांतिपूर्ण आंदलोन करण्यात आला आहे.*

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...