Saturday, 15 April 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती आज महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी !

भारतरत्न  डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती आज महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी !

नवी दिल्ली, दि. 14 : महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती आज महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...